Ahmednagar SouthBreakingMaharashtra

…म्हणून संग्राम जगताप यांचा फॉर्म भरायला जाणार नाही – राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई: विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आघाडी धर्म पाळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार संग्राम जगताप यांचा उमेदवारी फॉर्म भरायला जाणार नसल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितलं.

बंडाचा झेंडा फडकवत मुलगा सुजय विखे पाटील यांनी भाजप पक्षात प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासमोर नवा पेच उभा राहिला आहे. 

भाजपचे नगर दक्षिणचे खासदार दिलीप गांधी यांच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखे पाटील यांना टीकेला सामोरे जावे लागले.

या भेटीबाबत सांगताना विखे पाटील म्हणाले, “दिलीप गांधी मित्र आहेत. त्यांना नेहमी भेटतो. त्यांच्या भेटीत गैर नाही” असा दावा विखे पाटील यांनी केला आहे.

अहमदनगर जिल्हा काँग्रेसने भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांचा प्रचार करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विखे पाटलांनी यावर सावध प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, ” नगरमध्ये स्थानिक नेत्यांनी काय भूमिका घेतली यावर काय करायचं हे पक्ष ठरवेल.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button