लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने केली आत्महत्या.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अकोले : तालुक्यातील मान्हेरेत लग्नासाठी नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.

अकोले तालुक्यातील मान्हेरे गावातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी शारीरिक संबंध ठेवले व त्यानंतर लग्नास ऐन वेळी नकार दिला.

त्यानंतर सदर अल्पवयीन मुलीने विहिरीत गुरुवारी दि.२८ मार्च रोजी उडी मारून आत्महत्या करून स्वताचे जीवन संपविले.

याप्रकरणी आरोपीस शुक्रवारी कोर्टापुढे हजर केले असता आरोपीस तीन दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.       

याविषयी सविस्तर वृत्त असे , या घटनेतील पीडित मयत हिचे व दिनेश घोरपडे,यांच्यात प्रेमसंबंध होते,त्याने पीडित मयत अल्पवयीन मुलीशी शारीरिक संबंध ठेवत ती चार महिन्यांची गर्भवती होती.

त्यानंतर तिने त्यास लग्नाची गळ घातली मात्र त्याने ऐन वेळेला त्या अल्पवयीन मुलीस लग्नास नकार दिल्याने मयत अल्पवयीन मुलीने गुरुवारी दि.२८ मार्च रोजी,दुपारी २:१५ वाजेच्या सुमारास मान्हेरे गावातील गाव विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.

तिच्या चुलत्यांच्या फिर्यादीवरून गुरुवारी दि.२८ मार्च रोजी राजूर पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.त्याचा तपास पो.हे.कॉ.किशोर तळपे यांनी केला.

सदर अकस्मात मृत्यूमधील पीएम मध्ये सदर मयत ही चार महिन्यांची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाल्याने तसेच सदर मयताच्या भावाने राजूर पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.

त्यानुसार पोलिसांनी दिनेश दारकू घोरपडे (वय-२०वर्ष रा.मान्हेरे) याच्या विरोधात तक्रार दिल्याने भा.द.वी.कलम ३७६ (२) (ळ),३०६ तसेच पोक्सो कलम ४,५ (ग) (ळ ळ) ६ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment