आमदार संग्राम जगताप आहेत ‘इतक्या’ कोटींचे मालक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संग्राम जगताप यांच्याकडे ८ कोटी ५१ लाख ५३ हजार, तर त्यांची पत्नी शीतल यांच्याकडे ९३ लाख ४३ हजार रुपयांची संपत्ती आहे. 

जगताप यांच्यावर २ कोटी ९१ लाखांचे कर्ज असून त्याच्यावर केडगाव हत्याकांडप्रकरणी गुन्हा दाखल असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.

जगताप यांच्याकडे १ लाख ९८ हजार रुपयांची रोकड असून स्टेट बँक, मर्चंटस् बँक, पंजाब नॅशनल बँकेत त्यांच्या ठेवी आहेत. 

हॉटेल राज रिजेन्सी, राजयोग, राजश्री, राजनंद आणि तावरे पेट्रोलियममध्ये त्यांची भागीदारी आहे. जगताप यांच्याकडे इनोव्हा, होंडा या कार आहेत. 

आ.जगताप यांच्याकडे १०० ग्रॅम, तर पत्नीकडे ३०० ग्रॅम सोने आहे. नालेगाव, वाळवणे, बनपिंप्री, साकत खुर्द येथे शेतजमीन आहे. 

आमदारांकडे २ कोटी २५ लाख ६५ हजाराची स्थावर, तर ६ कोटी २५ लाख ८८ हजारांची जंगम मालमत्ता आहे. बनपिंप्री सोसायटी आणि विविध बँकांचे शेतीसाठी २ कोटी ९१ लाखांचे कर्जही त्यांनी घेतले आहे. 

Leave a Comment