Ahmednagar NewsAhmednagar SouthBreaking

भाजपच्या व्यवस्थापन समितीतून खा. गांधीना वगळले!

नगर : भारतीय जनता पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीची घोषणा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा निवडणूक प्रमुख राम शिंदे यांनी केली. या समितीतून खा. गांधी यांना वगळण्यात आले.

संयोजकपदी प्रसाद ढोकरीकर, निवडणूक सहप्रमुखपदी अभय आगरकर, प्रचार प्रमुखपदी नामदेव राऊत, आचारसंहिता प्रमुखपदी (कायदेशीर) अ‍ॅड.युवराज पोटे यांची निवड करण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील व्यवस्थापन समितीची रचना करण्याची सूचना करण्यात आली होती.

निवडणूक कार्यकाळात विविध समितीच्या प्रमुखपदी निवड करुन त्यांना मागणीनुसार सहायक देण्यात येतात. लोकसभा निवडणुकीच्या व्यवस्थापन समितीला अनन्यसाधारण महत्त्व असून, नियमितपणे ही समिती प्रदेश भाजपच्या संपर्कात राहत आहे. 

या लोकसभा कार्यक्षेत्रातील प्रचार सभा व इतर नियोजनासाठी आढावा घेतला जात असतो.लोकसभा समितीच्या इतर समित्यांमध्ये प्रिंट व इलेक्ट्रॉनिक्स मीडिया प्रमुखपदी निशांत दातीर.

कार्यालय प्रमुखपदी भय्या गंधे, दौरा प्रमुखपदी श्याम पिंपळे, सह दौराप्रमुखपदी सुभाष दुधाडे, जाहीर सभा प्रमुखपदी बापूसाहेब बाचकर, सहप्रमुखपदी रोहन मांडे, तसेच युती समन्वयकपदी सचिन पारखी यांची निवड करण्यात आली आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button