अहमदनगर :- अर्ज दाखल करण्यासाठी अवघे शेवटचे ५ मिनिट शिल्लक असताना भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
त्यांच्या अर्जावर संजना चंद्रशेखर कोळसे अनुमोदक व सुचक या आहेत. सौ. धनश्रीताईंनी देखील भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नगर लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवट दिवस होता.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे शेवटचे ५ मिनिट शिल्लक असताना भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या पत्नी धनश्री विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
सुजय विखे यांच्या उमेदवारी अर्जास अडचण आल्यास पर्याय म्हणून धनश्री विखेंनी अर्ज दाखल केल्याचे सांगितले जात आहे.
मात्र सध्या धनश्री विखे यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
- अहमदाबादमधील विमान अपघाताचे सत्य अखेर जगासमोर ! उड्डाणं घेताच दोन्ही इंजिन पडलेत बंद आणि….; अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल काय सांगतो?
- …अन्यथा जातेगाव- नगर- शिरूर महामार्गावरील टोलनाका बंद करा, मनसेचे रविश रासकर यांचा प्रशासनाला इशारा
- पाथर्डी पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांना दारूच्या बाटल्या अन साडी चोळी भेट देऊन आम आदमी पार्टीचे आंदोलन
- कर्जतचे ग्रामदैवत सदगुरू गोदड महाराजांची यात्रा उत्साहात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून तयारी, उपायोजनांसाठी घेण्यात आली आढावा बैठक
- अहिल्यानगर जिल्ह्यात ८० टक्के खरिपाच्या पेरण्या, मात्र पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात, दुबार पेरणीची आली वेळ?