अहमदनगर लोकसभा मतदारसंघ 19 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, 8 एप्रिल 2019 रोजी 7 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गायकवाड सबाजीराव महादू (अपक्ष),घोडके गौतम काशिनाथ (अपक्ष), रामकिसन गोरक्षनाथ ढोकणे (अपक्ष), शितोळे सुदर्शन लक्ष्मण (अपक्ष),

शेख रियाजोददीन फजलोददीन दादामियाँ (अपक्ष),शेटे गणेश बाळासाहेब (अपक्ष), सुनिल शिवाजी उदमले (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले.

त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये 19 जणांची उमेदवारी कायम राहिली आहे. 5 एप्रिल रोजी झालेल्या छाननीमध्ये एकूण 26 अर्ज वैध ठरविण्यात आले होते.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये वाकळे नामदेव अर्जुन (बहुजन समाज पार्टी), सुजय राधाकृष्ण विखे (भारतीय जनता पार्टी), संग्राम अरूणकाका जगताप (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी),

कलीराम बहिरू पोपळघट (भारतीय नवजवान सेना),धिरज मोतीलाल बताडे (राईट टू रिकॉल पार्टी),फारूख इस्माईल शेख (भारतीय प्रजा सुराज्य पक्ष), सुधाकर लक्ष्मण आव्हाड (वंचीत बहुजन आघाडी),

संजय दगडू सावंत (बहुजन मुक्ती पार्टी),आप्पासाहेब नवनाथ पालवे (अपक्ष),कमल दशरथ सावंत (अपक्ष), दत्तात्रय आप्पा वाघमोडे (अपक्ष), भास्कर फकिरा पोटोळे (अपक्ष), रामनाथ गहिनीनाथ गोल्हार (अपक्ष),

शेख आबीद मोहम्मद हनीफ (अपक्ष),साईनाथ भाऊसाहेब घोरपडे (अपक्ष), सुपेकर ज्ञानदेव नरहरी (अपक्ष), संजीव बबन भोर (अपक्ष), संदीप लक्ष्मण सकट (अपक्ष), श्रीधर जाखुजी दरेकर (अपक्ष) यांचा समावेश आहे.

Leave a Comment