अहमदनगर :- केडगावमधील दोन शिवसैनिकांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून श्रध्दांजली वाहिली.
कॅण्डलमार्चमुळे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन झाल्याप्रकरणी शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड यांच्यासह ८० जणांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

केडगावातील शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची ७ एप्रिल २०१८ रोजी गोळ्या झाडून हत्या झाली. या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याने शिवसेनेने कॅण्डलमार्च काढून दोन्ही शिवसैनिकांना श्रध्दांजली वाहिली.
राठोड यांच्यासह शहरप्रमुख दिलीप सातपुते, जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, अमोल येवले, योगिराज गाडे आदी मार्चमध्ये सहभागी झाले होते.
केडगाव गावठाण, अंबिका बसस्टॉप, शाहूनगर मार्गे सुवर्णानगर असा कॅण्डलमार्च काढण्यात आला. मात्र, त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी बजावलेल्या प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग झाला.
कोतवाली पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल नवनाथ गोरे यांच्या फिर्यादीवरून राठोड, गाडे, सातपुते यांच्यासह ८० जणांच्या विरूध्द जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- जपानी लोक इतके शांत आणि यशस्वी का असतात?, नेमकी कशी असते त्यांची ‘शुकन’ लाईफस्टाइल?
- पावसाळ्यात केस गळतीने त्रस्त आहात?, मग मोहरीच्या तेलात ‘ही’ एकच गोष्ट मिसळून लावा! त्वरित होईल फायदा
- ‘या’ दोन मूलांकच्या लोकांनी कधीच एकमेकांशी लग्न करू नये, आयुष्य उद्ध्वस्त करून बसाल!
- ना जहाज, ना विमान…चीननं बनवलं सागरी युद्धासाठी भयानक शस्त्र! चीनचं ‘एक्रानोप्लान’ भारतासाठी नवं संकट?
- मुघल दरबारात पाऊल ठेवणारा पहिला इंग्रज कोण?, UPSC मध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितेय का?