अहमदनगर :गेल्या साडेचार वर्षात पोकळ घोषणा आणि खोटी आश्वासने देवून जनतेची फसवणूक करणाऱ्या भाजपाने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर व श्रीगोंदा तालुक्यातील दुष्काळी पट्टयातील जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्यासाठी साकळाई योजनेचे गाजर दाखवण्यिाची योजना आखली आहे.
हे गाजर घेवून खुद्द मुख्यमंत्री वाळकीत येणार आहेत. पण त्यांच्याकडून ही योजना पूर्ण होवू शकत नाही. या दुष्काळी भागाला केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच कुकडीचे पाणी मिळवून देवू शकतो असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांनी केले.

लोकसभेच्या नगर दक्षिण मतदारसंघातील कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मत्रि पक्ष आघाडीचे उमेदवार आ. संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ वाळकी (ता.नगर) येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील व आ. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली.
याप्रसंगी आ. अरुण जगताप, आ.राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, जि.प.सदस्य प्रताप शेळके, माधवराव लामखडे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ, उद्धवराव दुसुंगे, केशव बेरड, अंबादास गारुडकर, अशोक बाबर, भाऊसाहेब बोठे, रंगनाथ निमसे, रमेश भांबरे, अशोक कोकाटे, ज्ञानदेव दळवी, मनोज भालसिंग, सिताराम काकडे, दादासाहेब दरेकर, शारदाताई लगड, नर्मिला मालपाणी आदी उपस्थित होते.
- अहिल्यानगर जिल्ह्यात आतापर्यंत ११० मिमी पावसाची नोंद, धरणांत सुमारे ७० टक्क्यांवर पाणीसाठा, जाणून घ्या कोणत्या धरणात किती आहे पाणीसाठा?
- अहिल्यानगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात डाळिंबांना १५ हजार रुपयांपर्यंत भाव, जाणून घ्या इतर फळांचे आजचे बाजारभाव
- 25 हजार कोटी रुपयांचा पुणे – छत्रपती संभाजी नगर महामार्ग प्रकल्प कुठे अडकला ? निधीची तरतूद केव्हा होणार?
- अहिल्यानगरमध्ये फर्निचरचे निकृष्ट दर्जाचे काम करुन केली ४ लाख ५१ हजार रुपयाची फसवणूक, तिघांविरोधात गुन्हा दाखल
- आठ वर्षापासून बंद असलेले अहिल्यानगर महापालिकेचे स्पर्धा परिक्षा केंद्र लवकरच होणार सुरू, मनपा आयुक्त यशवंत डांगे यांचा पुढाकार