मोदींसारख्या नेतृत्वामुळे जगात देशाची मान उंचावली !

अहमदनगर : युती सरकारने सर्वसामान्यांच्या हितासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी चांगले नर्णिय घेतले असून मोदींसारखे खमके नेतृत्व देशाला लाभल्याने देशाची मान जागतिक स्तरावर अभिमानाने उंचावली आहे.

नरेंद्र मोदी यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी ही निवडणुक महत्वपुर्ण आहे. नगरमध्ये दहशत नर्मिाण करणाऱ्यांच्या व विकासकामांना खो घालणाऱ्यांच्या पाठीशी जनता कदापी उभी राहणार नाही.

डॉ. सुजय विखे हे राज्यातील मोजक्या न्युरोसर्जनपैंकी एक असून त्यांच्यासारखा उच्चवद्यिाविभूषित उमेदवार निवडणूक लढवतोय ही आपल्या सर्वांच्या हिताची बाब असल्याचे मत माजी आमदार अनिल राठोड यांनी व्यक्त केले.

Related Posts
Loading...

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय, रासप आणि मत्रिपक्षाचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या निवडणुक प्रचारार्थ नगर शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी श्री. राठोड बोलत होते. नगर शहराचे आराध्य दैवत विशाल गणपती येथे श्रीफळ वाढवुन आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. शिवसेनेचे उपनेते माजीमंत्री अनिल राठोड, संभाजी कदम, ॲड. अभय अगरकर, सुनिल रामदासी, सुवेंद्र गांधी, माजी महापौर सुरेखा कदम यांच्यासह महायुतीतील मत्रिपक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यांच्या निवडणुक प्रचारार्थ नगर शहरातून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत भाजप, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह महिला, युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी श्री. राठोड बोलत होते.

नगर शहराचे आराध्य दैवत विशाल गणपती येथे श्रीफळ वाढवुन आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करुन या यात्रेचा शुभारंभ करण्यात आला.