Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन – डॉ.सुजय विखे.

अहमदनगर : आज उत्तरेचे अतक्रिमण म्हणून आमच्यावर निरर्थक टिका केली जाते पण अतक्रिमण करण्याची सवय कोणाची आहे हे नगरकर चांगलेच जाणुन आहेत.

समोरचा उमेदवार मी तुमच्यासाठी २४ तास उपलब्ध असल्याचे गुणगान गात आहे पण तुम्ही त्याला तुमच्या कामाचा अर्ज देवू शकता का? असा सवाल डॉ.सुजय विखे पाटील यांनी उपस्थित केला.

नुसते उपलब्ध असुन चालत नाही तर, जनतेचे प्रश्न जाणुन घेवून ते अभ्यासपुर्ण पध्दतीने सोडवावे लागतात, सभागृहात मांडावे लागतात पण ज्यांचा इतिहास सभागृहात फक्त २ मिनिटे बोलण्याच्या आहे ते तुमच्या प्रश्नांना काय उत्तर देणार अशी उपरोधीक टिकाही त्यांनी केली.

निवडणुक प्रचाराच्या निमत्तिाने तालुक्यातील भोरवाडी, चास, सोनेवाडी, कामरवाडी, सारोळा कासार आणि अकोळनेर येथे डॉ.सुजय विखे पाटील यांनी मतदारांच्या भेटीगाठी घेवून संवाद साधला.

निवडणुकीतील आपली भुमिका मतदारांसमोर मांडताना त्यांनी तालुक्यातील आणि मतदार संघातील विविध प्रश्नांवर भाष्य करुन या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकसभेत अभ्यासुपणे प्रश्न मांडणारा खासदार जाणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे यांनीही या भागाचे नेतृत्व करताना जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. मात्र त्यांना काम करण्यासाठी कमी कालावधी मिळाला. त्यांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी ही निवडणुक आहे

याकडे लक्ष वेधून डॉ.विखे पाटील म्हणाले की, आम्ही घेतलेल्या आरोग्य शिबीरांवर टिका करणाऱ्यांनी गुणे आयुर्वेद महावद्यिालयातुन किती लोकांवर मोफत उपचार केले हे एकदा जाहीरपणे सांगावे असे आवाहन त्यांनी केले.

एक काळ या आयुर्वेद महावद्यिालयाचा संपुर्ण राज्यात नावलौकीक होता. आज या महवद्यिालयाची अवस्था काय आहे, एका राजकीय पक्षाचे कार्यलय म्हणुन आज ओळख होत आहे हे दुर्दैव असल्याची टिका त्यांनी केली.

शेतकऱ्यांचे प्रश्न सभागृहात माडांवे लागतील, नदीजोड प्रकल्पावर बोलावे लागेल, पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी पुर्वेकडे वळवण्यिाच्या संदर्भातील प्रश्नांचा पाठपुरावा करावा लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी स्वतंत्र जलमंत्रालय स्थापन करण्याचे नगरमध्ये केलेले भाष्य हे महत्वाचे आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button