Ahmednagar CityBreaking

सत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले – मुख्यमंत्री फडणवीस

अहमदनगर :- साकळाई पाणी योजनेची मागणी २५ वर्षांपूर्वीची आहे. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी जनतेला फक्त खेळवण्याचे काम केले. अनेक जुने प्रश्न आम्ही सोडवले.

साकळाईचा प्रश्नही सोडवू. कोणाच्याही वाट्याचे पाणी कमी न करता साकळाईला पाणी उपलब्ध होईल.

विधानसभा निवडणुकीपूर्वी नगर आणि श्रीगोंद्याच्या जिरायत भागाला वरदान ठरणाऱ्या साकळाई पाणी योजनेला मंजुरी देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाळकी येथील प्रचारसभेत मंगळवारी दिले.

भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत मुख्यमंत्री बोलत होते. पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे,

बबनराव पाचपुते, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग, शिवसेनेचे राजू भगत,

काँग्रेसचे बाळासाहेब हराळ, सुवेंद्र गांधी, अभिनेत्री दीपाली सय्यद, आरपीआयचे सुनील साळवे या वेळी उपस्थित होते. 

बोगदा तयार करून कुकडी प्रकल्पात ५ टीएमसी अतिरिक्त पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून साकळाईला पाणी देण्यात येईल.

सौरऊर्जेचा वापर करण्यात येईल. त्यामुळे वीजबिलाला प्रश्न सुटेल. डॉ. विखे यांची ओळख आता वॉटरमन म्हणून तयार झाली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. 

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button