Ahmednagar CityBreakingMaharashtra

‘सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे यांना काँग्रेस पक्षाने काय दिले नाही ?

पारनेर :- सत्तेसाठी भाजपात गेलेल्या विखे परिवाराला काँग्रेस पक्षाने काय दिले नाही.असा सवाल साधत माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटलांवर निशाना साधला.

दिवंगत बाळासाहेब विखे पाटील हे ३५ वर्षे खासदार होते. परंतू त्यांनी आपला सुसंस्कृतपणा कधी सोडला नाही.

काल परवा आलेले तुझा बंदोबस्त करतो, अशी भाषा वापरत आहेत. उमेदवारांना अशी भाषा शोभत नाही.

ज्या भाजपवर वर्षभर टीका केली, त्यांचीच उमेदवारी बालहट्टापायी घ्यावी लागली,असा टोला आमदार बाळासाहेब थोरात यांनी विखे पाटील यांना लगावला.

लोकसभेचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथे आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

या वेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, मंगलसिंग बांदल, युवानेते रोहित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनशाम शेलार, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे,

सदस्य माधवराव लामखडे, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष कपील पवार, युवानेते निलेश लंके, तालुकाध्यक्ष बाबाजी तरटे आदी उपस्थित होते.

रोहित पवार म्हणाले, ‘परिवर्तनातून आपल्या विकासाचे सरकार आले पाहिजे. सध्याच्या सरकारकडून शेतकरी व युवकांची चेष्टा सुरू आहे. त्यामुळे पाच वर्षातील स्वाभिमान न विसरता मतदारांनी अमिषाला बळी न पडता सरकार उलथवून टाका.

निलेश लंके म्हणाले, ‘उत्तरेतून आलेले सुजय विखे लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने दक्षिणेच्या मानगुटीवर बसतील. त्यामुळे हे उत्तरेचे भूत मानगुटीवर बसु न देता ते पार्सल परत पाठवा.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button