अहमदनगर : महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ २१ एप्रिलला केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्री ना.स्मृती इराणी यांची जामखेड येथे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची २० एप्रिल रोजी कर्जत येथे तर ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची २० एप्रिल रोजी शेवगांव येथे जाहीर सभा होणार असल्याची माहिती भाजपाचे संयोजक प्रसाद ढोकरीकर यांनी दिली.

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांची नगर तालुक्यातील वाळकी येथे ऐतिहासिक सभा झाली. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघाची निवडणुक प्रमुख जबाबदारी असलेले राज्याचे जलसंधारण मंत्री ना.राम शिंदे हे राज्याचे स्टार प्रचारक असल्याने त्यांच्याही सोयीनुसार जिल्ह्यात सभा होत आहे.


राज्याच्या स्टार प्रचारकांच्या यादीसह देशातील प्रमुख नेत्यांच्या सभा नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात व्हाव्यात, यासाठी भाजपाचे लोकसभा निवडणूक व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.

केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री ना.स्मृती इराणी यांची सांगता सभेला उपस्थिती ही जमेची बाजू ठरणार आहे. ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांचे या मतदार संघावर विशेष लक्ष असून,
यापूर्वीही त्यांनी मतदार संघात सभा घेतल्या आहेत. आता पुन्हा २० एप्रिल रोजी एकाच दिवशी कर्जत येथे मुख्यमंत्री ना.फडणवीस व शेवगांव येथे ना.पंकजाताई मुंडे यांची सभा होणार आहेत.
- बिजनेस ठप्प झालाय, पैशांची आवकही थांबलीये?’हा’ वास्तु उपाय तुमचं नशिबच बदलेल!
- घरबसल्या फक्त 2 मिनिटांत कळणार ₹2000 खात्यावर आलेत की नाही?, ‘अशी’ चेक करा PM किसानची लाभार्थी यादी!
- 6000mAh बॅटरी, 144Hz डिस्प्ले आणि 64MP कॅमेरा! अवघ्या 12,999 रुपयांत खरेदी नेटवर्कशिवाय चालणारा भन्नाट स्मार्टफोन
- महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी Good News ! ‘ह्या’ 2900 किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गावर धावणार नवीन एक्सप्रेस, कुठून कुठपर्यंत धावणार? पहा..
- वाहनचलकांनो लक्ष द्या! मोबाइलवर ‘हा’ मेसेज आल्यास क्लिक करू नका, अन्यथा एका झटक्यात बँक अकाऊंट होईल रिकामं