जामखेड :- निवडणूक विचाराची आहे. मतदान करताना विवेकबुद्धी जागृत ठेवून मतदान करा. दोन्ही उमेदवारांची कौटुंबिक पाश्र्वभूमी तपासा, समोरच्या उमेदवाराची सखोल माहिती घेऊनच मतदान करा.
कुणाची दहशत आणि गुंडगिरी आहे हे पहा आणि लोकसभेत सर्वात उच्चशिक्षित खासदार पाठवा, असे आवाहन भाजपचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी केले. जामखेडमधील प्रचारसभांमध्ये ते बोलत होते.

पालकमंत्री राम शिंदे म्हणाले. पाकिस्तानला धडा शिकवण्याची हिंमत पंतप्रधान मोदी यांनी दाखवली त्यामुळे प्रत्येक भारतीयांचा मान, अभिमान व स्वाभिमान उंचवला आहे.
वेगवेगळ्या योजनेतील भ्रष्टाचार कमी करून अनुदान थेट लाभधारकाच्या खात्यात जमा होत आहे. जामखेड विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला.
त्यातून अनेक मूलभूत प्रश्न मार्गी लागले. मतदारसंघातील एकही गाव पक्क्या रस्त्यापासून वंचित राहिले नाही.
- पाथर्डीत मावा विक्रेत्यांवर खाडे यांचा धाडसी छापा; १.३३ लाखांचा मुद्देमाल जप्त
- शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करा; उपोषणाचा इशारा
- EPFO चा मोठा निर्णय ! ‘या’ कामासाठी सुद्धा आता 90% PF काढता येणार
- वडिलोपार्जित जागेवर घर बांधणाऱ्यांवर कारवाई करा ! नगर परिषदेचा गलथान कारभार उघड
- MSRTC Bus : एसटीला पांडुरंग पावला ! वारीत ५२०० जादा गाड्या, एसटीला मिळाले ३५ कोटी