Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

किंगमेकर असणारे आ. शिवाजीराव कर्डिले द्विधा मन:स्थितीत !

राहुरी – नगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये वेळोवेळी मीच किंगमेकर म्हणणारे आ. शिवाजीराव कर्डिले हे द्विधा मन:स्थितीत दिसून आले आहे.

एकीकडे जावई संग्राम जगताप तर दुसरीकडे आपल्या पक्षाने दिलेले डॉ. सुजय विखे या उमेदवारांपैकी आ. कर्डिले कोणाला मदत करणार हे कोडे मतमोजणीनंतरच उघड होणार असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपूत्र डॉ. सुजय विखे यांना पक्षात आणण्याची महत्वाची भूमिका आ.कर्डिले यांनी पार पाडली.

दरम्यान , आ. कर्डिले यांच्या खेळीला चितपट करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसेर्वा शरद पवार यांनीही मोठी गुगली टाकली.

राष्ट्रवादीने आ. कर्डिले यांचे जावई आ. संग्राम जगताप यांना उमेदवारी जाहिर केली. यावेळी दक्षिण नगर लोकसभा मतदार संघात आ. कर्डिले यांनी श्रीगोंदा तालुक्यात केलेल्या वक्तव्याची सर्वांना आठवण झाली.

श्रीगोंदा येथे झालेल्या कारखान्याच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीने जगताप यांना उमेदवारी दिल्यास पक्षाविरोधात आपण राष्ट्रवादीचे काम करू अशी भूमिका आ. कर्डिले यांनी जाहिरपणे मांडली होती.

त्यांच्या याच वक्तव्याला लक्षात घेता डॉ. सुजय विखे यांना उमेदवारी भाजपने दिल्यापसून आ. कर्डिले यांच्या भूमिकेकडे सर्वच जण पाहत होते,

आ. कर्डिले हे नेहेमीच आपल्या हजर जबाबी वक्तव्याने विरोधकांना घायाळ करतात हे नेहेमीच दिसून आले.

मात्र , डॉ. सुजय विखे यांच्या प्रचार यंत्रणेत आ. कर्डिले यांचे वक्तव्य नेकमेपणाचे दिसून आले. केवळ पक्षाबद्दल बोलून आ. कर्डिले यांनी वेळोवेळी जगताप कुटुंबीयांबाबत बोलणे टाळल्याचे दिसून आले.

तसेच नगर, पाथर्डी येथील आ. कर्डिले यांचे कट्टर समर्थकही आ. जगताप यांच्या प्रचारात दिसून आले.

तर दुसरीकडे राहुरीतही आ. कर्डिले यांनी डॉ. सुजय विखे यांच्यासाठी मताधिक्य देण्यासाठी विशेष चर्चाही कार्यकर्त्यांशी केली नसल्याचे त्यांचे कार्यकर्ते दबक्या आवाजात बोलत आहे.

यामुळे आ. कर्डिले हे दोन्ही बाजुने कात्रीत सापडल्याचे दिसून आलेले आहे. यामुळे आ. कर्डिले यांनी किंगमेकरची भूमिका कोणासाठी पार पाडली हे २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीच्या दिवशीच उघड होणार आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button