Ahmednagar NorthBreaking

शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे पाप मोदी-फडणवीस सरकारने केले नाना पटोले यांची जोरदार टीका

संगमनेर : अन्नदात्या शेतकऱ्यांची चेष्टा करण्याचे पाप मोदी आणि फडणवीस सरकारने केले. या सरकारने शेतकऱ्यांसह सामान्य माणसांना कोणत्याही योजनांचे अर्ज ऑनलाइन भरायला लावले.

मात्र, रुपयाचाही फायदा पदरात पडला नाही. आपल्याला ऑनलाइन करणाऱ्यांना आता पाइपलाइनमध्ये टाकण्याची वेळ आली आहे. हे सरकार पुन्हा आले, तर आपण आर्थिक गुलामगिरीत जाऊ, अशी प्रखर टीका काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी मंगळवारी केली. 

पटोले म्हणाले, सरकारच्या शेतकरी िवरोधी धोरणामुळे मी भाजपमधून बाहेर पडलो. जी मुफ्ती महेबुबा पाकिस्तानच्या दहशतवादाचे समर्थन करते, त्यांच्याच सोबत मोदींच्या भाजपने तीन वर्षे संसार केला.

तेथील तरुणांच्या हातात दगड-गोटे दिले. हेच दगडगोटे आमच्या सैनिकांवर फेकले गेले. आमच्या मोदींनी सैन्यांना मारणाऱ्यांना सोडून त्यांच्यावर खटले दाखल केले. आता हेच सरकार सैनिकांचे नाव घेऊन देशप्रेमाचे दाखले देत आहे. संघाची भूमिका देशाचे संविधान संपवण्याची आहे. यांनी देशावर ८५ लाख कोटींचे कर्ज देशावर केले. देशाला गहाण ठेवले.

दहशतवाद्यांनी, नक्षलवाद्यांनी पाच वर्षांत जेवढे सैनिक मारले, तेवढे सैनिक याआधी कधी मारले गेले नव्हते. दोन हजार रुपयांच्या नोटा चीनमध्ये तयार केल्या गेल्या. पाकिस्तानसोबत दोस्ती करतात. देशाच्या शत्रूसोबत यांची मैत्री आहे.

चीन-पाकिस्तानला मोदी पंतप्रधान हवे आहेत. उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब उद््ध्वस्त करण्याचे काम सुरू आहे. २०२१ च्या जनगणनेत यामुळे देशात कोणीच गरीब दिसणार नाही. छत्रपतींचे नाव घेऊन तरुणांना बिघडवण्याचे काम शिवसेना करत आहे.

विदर्भातील अकोल्याचा अपवाद वगळता आठपैकी सातही जागा आघाडी जिंकेल. सरकार जनतेची मते चोरून सत्तेवर येऊ पहात आहे. मतदानाला गेल्यानंतर ईव्हीएमवर मत योग्य उमेदवारालाच गेले का याची खात्री करा. थोरात, ससाणे, कांबळे, खरात, गायकवाड, निर्मला गुंजाळ, गणपत सांगळे, शंकर खेमनर आदींची भाषणे झाली. 


Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button