Ahmednagar NorthBreaking

अहमदनगर ब्रेकिंग : डोक्यात दगड घालून युवकाचा खून

संगमनेर :- तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करीत डोक्यात दगड घालून अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयाच्या युवकाचा निघृणपणे खून केला.

आरोपींनी मृतदेह फरफटत ओढत नेवून दगड खाणीत फेकला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बुधवारी दि. १ मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.

खून झालेल्या युवकाची ओळख पटू शकली नाही. याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द शिवारात किसन काळू थोरात नामक शेतकऱ्याच्या शेतात दगड खाण आहे.

सदर दगड पाहणीसाठी रामदास बाळासाहेब नवले हे गेले होते. त्यांना दगडखाणीत कुजलेल्या व दुर्गंधी सुटलेल्या अवस्थेत युवकाचा मृतदेह आढळून आला.

त्यांनी पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांना घटनेची माहिती दिली. सुपेकर यांनी खातरजमा करून पोलिसांना खबर दिली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीसांनी तातडीने घटनास्थळी येवून माहिती घेत मृतदेहाचा पंचनामा केला. घटना स्थळादरम्यान ठिकठिकाणी रक्त सांडलेले होते.

मृतदेहाचा चेहरा शर्टने बांधलेल्या स्थितीत होता. मृतदेहानजीक पोलिसांना चपला तसेच एक्टिवा गाडीची चावी सापडली. किमान तीन दिवसांपूर्वी हा खून केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

याप्रकरणी प्रथम संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर अज्ञात आरोपींविरुद्ध भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. वडझरी खुर्द शिवारात उघडकीस आलेल्या या घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे.

Tags

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close
Close