शरद पवारांचा दुसरे नातू विधानसभेच्या आखाड्यात !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पुणे : माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. आपण विधानसभा लढण्यासाठी इच्छुक असून, अद्याप मतदारसंघ ठरला नाही, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.

रोहित पवार हे सध्या पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीकडून बारामतीचं प्रतिनिधित्व करतात. पवार कुटुंबातील असल्याने मोठं राजकीय वलय त्यांना आहे.

मात्र, रोहित पवार कर्जत जामखेड मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरणार, असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

तसेच, लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला 23 जागा मिळतील, असा अंदाज रोहित पवार यांनी वर्तवला आहे.

राज्यात दुष्काळ भयानक परिस्थिती आहे. पुण्यात पाण्याचं योग्य नियोजन नाही. नियोजन अभावी पाणी टंचाई आहे, असे म्हणत रोहित पवार पुढे म्हणाले, “जलयुक्त शिवार अभियानाचं यश दाखवण्यासाठी जामखेडला गरज असताना कमी टँकरनं पाणी दिलं जात आहे.”

Leave a Comment