नगर: महापालिकेतील शहर अभियंता विलास सोनटक्के यांना बूट फेकून मारल्याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
त्यापैकी नगरसेवक अशोक बडे व मदन आढाव यांना पोलिसांनी अटक केली. इतर आरोपींनी मात्र न्यायालयाकडे जामिनासाठी विनंती अर्ज सादर केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

बोल्हेगाव उपनगरातील रस्त्याचे काम बंद पडल्याच्या निषेधार्थ शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक अशोक बडे, आकाश कातोरे मदन आढाव, नगरसेविका कमल सप्रे, रिता भाकरे, दत्तात्रय सप्रे आदींनी नागरिकांसह आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या कार्यालयात ठिय्या दिला होता.
यावेळी संतप्त कार्यकत्यांनी सोनटक्के यांना शिवीगाळ व दमदाटी करत बूट फेकून मारला होता. याप्रकरणी सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी राठोड यांच्यासह २० जणांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला होता.
बूट फेकून मारणारा आरोपी मदन आढाव याला त्याच रात्री अटक करण्यात आली. नंतर नगरसेवक अशोक बडे यांनाही अटक करण्यात आली. न्यायालयाने दोघांनाही पोलिस कोठडी सुनावली.
इतर फरार आरोपींनी मात्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज सादर केला असून त्यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. राठोड यांनी कार्यकत्यांना चिथावणी दिली असल्याचे फिर्यादित म्हटले आहे.
त्यांना चांगली भाषा समजत नाही, त्यांना शिवसेना स्टाईल दाखवा, अशी चिथावणी राठोड यांनी दिली होती.
त्यानंतर आढाव याने पायातील बूट काढत सोनटक्के यांना फेकून मारला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
- अहिल्यानगरच्या बाजार समितीत चोरट्यांनी एकाच रात्री फोडली आठ दुकाने, लाखोंच्या मुद्देमालाची चोरी; हाकेच्या अंतरावरच पोलिस चौकी
- भंडारदरा परिसरात मुसळधार पाऊस, भंडारदरा धरण ७ टीएमसी पार तर निळवंडे ५३% भरले
- महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! 8 व 9 जुलै 2025 रोजी राज्यातील सर्वच शाळा बंद राहणार, कारण काय ?
- अहिल्यानगर शहरात उभ्या राहणाऱ्या नाट्य संकुलासाठी १३ कोटींच्या निधींची गरज, नाट्य संकुलात ‘या’ असणार आहेत खास सुविधा
- ‘दोन दिवसात जीवे ठार मारू…’ अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांना धमकी !