दुष्काळात सरकार शेतकऱ्यांच्या मागे खंबीर पणे उभे – पालकमंत्री राम शिंदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

कर्जत : लोकसभा निवडणूक संपल्यानंतर आता मंत्र्यांचे  दुष्काळी दौरे सुरु झाले आहेत . पालकमंत्री राम शिंदे यांनी नगर, श्रीगोंदा, कर्जत आणि  जामखेड या तालुक्यात दुष्काळी दौरा केला.

 ‘दुष्काळात कोणत्याही प्रकारे उपायोजना करण्यात सरकार मागेपुढे पाहणार नाही. पिण्याचे पाणी, तसेच पशूधन वाचवण्यासाठी चाऱ्याचे नियोजन करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत. टंचाईची स्थिती असली, तरी काळजी करू नका,’ असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी शेतकऱ्यांना दिला.

श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण, नगर तालुक्यातील वाळकी, कर्जत; तसेच जामखेड तालुक्यातील हाळगाव पिंपरखेड नागलवाडी व कोकणगाव येथील चारा छावण्यांना शिंदे यांनी भेटी दिल्या.

शिंदे यांनी छावणीतील जनावरांची माहिती संबंधित शेतकऱ्यांकडून घेतली. त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. या ठिकाणी चारा कशा पद्धतीने उपलब्ध होतो, पाण्याचे टँकर किती येतात, याची माहितीसुद्धा त्यांनी संबंधित शेतकऱ्यांकडून घेतली.

शिंदे म्हणाले, ‘सर्व उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता जिल्ह्यात चाराटंचाई हा विषय महत्त्वाचा आहे. कोणत्याही प्रकारे चारा कमी पडू दिला जाणार नाही.’

‘सध्या पिण्याच्या पाण्यासाठी टँकरसुद्धा उपलब्ध करून दिले आहेत. पशूधन वाचवण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी स्वतंत्र टँकरची व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत,’ असेही त्यांनी या वेळी सांगितले.

Leave a Comment