Lifestyle

जास्त दिवस जागायचे असेल तर स्मार्टफोनला दूर ठेवा !

न्यूयॉर्क : स्मार्टफोन हळूहळू लोकांच्या आयुष्यात हिस्सा बनत आहे. स्मार्टफोन शिवाय जीवन सुनेसुने वाटते, असे अनेकजण तुम्हाला अवतीभोवती सापडतील.

मात्र जवळचा जोडीदार बनलेला स्मार्टफोन तुमच्या जीवनाचा शत्रूही होऊ शकतो, याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

National Review

एका ताज्या अध्ययनातून असे समोर आले की, स्मार्टफोन अतिवापर जीवावरही बेतू शकतो. दीर्घ व निरोगी आयुष्य जगण्यासाठी फोनचा कमी वापर महत्त्वाचे पाऊल आहे.

फोनच्या वापराचा शरीरावर होणाऱ्या परिणामाचा विषय निघतो तेव्हा डोपामाइनचे नाव समोर येते. हे मेंदूत आढळून येणारे रसायन असून ते आपल्या सवयी ठरविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

peerrecoveryindiana.org

स्मार्टफोन व ॲप्स अशाप्रकारे तयार केले जातात की, त्यांच्या संपर्कात आल्यामुळे डोपामाइनचा स्राव वाढू लागतो.

असे झाल्याने व्यक्तीला त्याची सवय लागते व त्यापासून दूर होणे कठीण जाते. तज्ज्ञांच्या मते, डोपामाइनचा स्राव वाढल्याने फोन आपल्या सवयीचा हिस्सा होतो व उठता-बसता फोन पाहण्याची इच्छा होते.

techexplorist.com

आता स्मार्टफोनच्या संपर्कात राहिल्याने कार्टिसोलची पातळी वाढत असल्याचेही दिसून आले आहे. कार्टिसोलला स्ट्रेस हार्मोन म्हटले जाते.

या हार्मोनमुळे ह्रदयाची धडधड, रक्तदाब व रक्तातील साखर वाढते. एखाद्या धोक्याच्या स्थितीमध्ये हाच हार्मोन आपल्याला बचाव करण्याची प्रेरणा देतो.

Rambling Ever On

उदाहरणार्थ, एखाद्यामागे कुत्रा लागल्यास या हार्मोनचा स्राव वाढतो व प्रतिक्रिया म्हणून व्यक्ती वाचण्याचा प्रयत्न करतो. मात्र भावनात्मक दबावात त्याची पातळी वाढणे आरोग्यासाठी चांगले नसते.

तुम्ही ही जर स्मार्टफोन चा जास्त वापर करत असाल तर वेळीच सावध व्हा !

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button