Ahmednagar CityAhmednagar News

उदयोजक नरेंद्र फिरोदिया यांना मसाप कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

अहमदनगर: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना तर वाडमयीन चळवळीसाठीच्या योगदानाबद्दल डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार, नोहा मस्सील (इस्राईल) यांना जाहीर झाला आहे.

प्रथमच भारताबाहेरील व्यक्तीस हा कार्यकर्ता पुरस्कार दिला जात आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार युवा उदयोजक नरेंद्र फिरोदिया (नगरची सावेडी उपनगर मसाप शाखा) आणि रावसाहेब पवार (पुणे सासवड मसाप शाखा) यांना जाहीर झाला आहे.

राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक देण्यात येतो. यावर्षी मसापची मावळ शाखा (जिल्हा पुणे) या करंडकाची मानकरी ठरली आहे. राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा नाशिक रोड (नाशिक) यांना देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ११३ वा वर्धापनदिन २७ मे रोजी साजरा होत आहे. या वर्धापनदिन समारंभात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली हे पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button