अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना त्रास,आ.संग्राम जगताप यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

अहमदनगर :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून उद्योजकांना नाहक त्रास दिला जातो. खोट्या तक्रारी करून त्या मिटवून घेण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली जाते.
याप्रकरणी उद्योजकांनी आमदार संग्राम जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार निदर्शनास आणून दिला. जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.
प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी पाटील हे ठरावीक तक्रारदारांना हाताशी धरून उद्योजकांना त्रास देतात. उद्योग बंद करण्याच्या धमक्या देतात. त्यामुळे उद्योजकांमध्ये भिती निर्माण होते.
नंतर प्रकरण मिटवण्यासाठी निरोप पाठवला जातो. मोठ्या रकमेची मागणी केली जाते. या अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून काही उद्योजकांनी आमदार जगताप यांची भेट घेत सर्व प्रकार त्यांच्या निदर्शनास आणून दिला.
जगताप यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. एकीकडे शासन उद्योगवाढीचे धाेरण राबवत आहे, तर दुसरीकडे पाटील यांच्यासारखे मस्तवाल जर असे उद्योग करत असतील, तर नवीन उद्योगांना खीळ बसेल, असे जगताप यांनी तक्रारीत म्हटले आहे.
- मोठी बातमी : लालू लालूप्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी झालं…
- प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन केले असे काही…
- निवडणुकीच्या वादातून तरुणास मारहाण केल्याने ‘त्या’ पाच जणांविरोधात गुन्हा
- स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या आशिर्वादामुळे महाराष्ट्रात शिवसेनेचे सरकार !
- देशातलं सर्वात महाग पेट्रोल मिळतय ह्या जिल्ह्यात