Ahmednagar NorthBreaking

गाडीला धक्का लागल्याचा राग,दोन गटांत तुफान दगडफेक, नगरसेवकासह ९ जणांना अटक

कोपरगाव :- धक्का लागल्याचा राग येऊन स्विफ्ट कारचालकाने मोटरसायकलस्वारास मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री ९ वाजता गांधीनगर भागात घडली. त्यानंतर दोन गट आमने-सामने येऊन प्रचंड धक्काबुक्की व दगडफेक झाली. लाकडी दांडक्याने व चाकूने वार करण्यात आले. दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली. पोलिस वेळेत पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

शीघ्र कृतिदलाची एक तुकडी बोलवल्यावर परिस्थिती आटोक्यात आली. या घटनेत ४ ते ५ जण जखमी झाले. यासंदर्भात दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. एका नगरसेवकासह ९ जणांना अटक झाली.

शोएब फिरोज शेख (दत्तनगर) हे मोटारसायकलीवर (एमएच १७ – ५६१) सामान घेण्यासाठी जात असताना त्यांना पाठीमागून येणाऱ्या स्विफ्ट कारचा धक्का लागला. कारचालक मयूर जयराम पंडोरे याला तुला कार नीट चालवता येत नाही का?

असे तो म्हणाला असता मयूरने कारमधून उतरुन शोएबला शिवीगाळ केली. दोघांत भांडण होऊन धराधरी झाली. मयूर रागात निघून गेला. शोएब मोटरसायकल चालू करत असतानाच मयूर लाकडी दांडा घेऊन, तर नयन संजय मेहरे हातात चाकू घेऊन आला.

सुमन संजय मेहरे, राहुल संजय मेहरे, भाऊ लकारे, सोनु पंडोरे, सुमीत दुसाणे, किशोर रामचंद्र पंडोरे, शिवा गोरख पंडोरे, कैलास गोरख मेहरे (सर्व गांधीनगर) व इतर ४-५ लोक आले. मयूरने दांडक्याने शोएबच्या डोक्यात, पाठीवर व मानेवर मारले.

नयन मेहरे याने चाकूने गळ्यावर वार केला. शोएबने चाकू उजवे हाताने अडवल्याने त्याच्या दंडावर जखम झाली. भांडणात मध्ये पडलेल्या रिजवान रियाज सय्यद यास शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. शोएबने संबंधितांविरोधात फिर्याद दिली आहे.

मयूरच्या फिर्यादीनुसार तो मित्र नाना थेटे याची कार लग्नाकरिता घेऊन आला होता यावेळी शोएब मोटरसायकलीवरुन जात होता. हॉर्न वाजवला असता शोएबला त्याचा राग आला. मयूर गाडी थोडी पुढे घेऊन खाली उतरला असता नाझीम शेख,अझर शेख, मेहमूद सय्यद, मोहसीन मेहमूद सय्यद, शोएब फिरोज शेख, रिजवान रिवाज सय्यद, नासिर पठाण, सादिक अकिल पठाण, फिरोज रफिक शेख, रियाज गयास सय्यद व इतर अनोळखी व्यक्तींनी त्यास शिवीगाळ केली.

शोएब बल्लीने डोक्यात मारले. वार झेलल्यामुळे दोन्ही हात जखमी झाले. नयन मेहरे, सुमन संजय मेहरे, राहुल मेहरे, भाऊ लकारे, सोनु पंडोरे (सर्व गांधीनगर) व सुमित दुसाणे (लक्ष्मीनगर) हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली.

पोलिसांनी मयूर जयराम पंडोरे, नयन संजय मोरे, सोनु ऊर्फ किशोर राजेंद्र पंडोरे, शिवा गोरख पंडोरे, कैलास गोरक्षनाथ मेहरे व नगरसेवक मेहमूद मन्वर सय्यद, मोहसीन सय्यद, शेाएब फिरोज शेख, रिजवान रियाज शेख या नऊ आरोपींना सोमवारी अटक केली.

दंगलीतील नऊ आरोपींना पोलिसांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर उभे केले. त्यांना २२ मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. अाणखी २५ ते ३० आरोपींना अटक व्हायची आहे.

पोलिस उपअधीक्षक वाकचौरे, प्रभारी निरिक्षक प्रवीण लोखंडे यांनी दंगल काबूत आणली. या प्रकरणी नगरसेवक मेहमूद सय्यदसह ९ जणांना अटक झाली असून दोन्ही बाजुंकडील सुमारे ३० जणांविरुद्ध कारवाई झाली आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button