Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreaking

मतमोजणीच्या परिसरात जमावबंदी

अहमदनगर :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी आज सकाळी ८ वाजेपासून वखार महामंडळ गोदामात होणार आहे. 

त्यामुळे मतमोजणी केंद्र परिसरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केला आहे. या परिसरात उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हजर राहण्याची शक्यता आहे. 

तसेच मतमोजणी प्रक्रियेत खीळ घालण्याचे उद्देशाने व बाधा निर्माण करण्याच्या हेतूने काही अपप्रवृत्ती कार्यरत होण्याची शक्यता आहे. 

या पार्श्वभूमीवर मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, हा प्रतिबंधक आदेश जारी करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button