अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघात भाजपच्या डॉ. सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यात सुजय विखे यांनी बाजी मारली आहे.
आतापर्यत डॉ.विखे यांनी चौदाव्या फेरीअखेर तब्बल दोन लाखांहून जास्त मताधिक्य मिळाले आहे. त्याच बरोबर आमदार जगताप यांचे होमग्राउंडव असलेल्या नगर शहरातच भाजपच्या डॉ.सुजय विखे यांना लीड मिळाले आहे.

अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून तब्बल ४० हजार मतांचे लीड मिळाल्याचे वृत्त आहे.अहमदनगर शहरातून २०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत संग्राम जगताप यांनी विजय मिळविला होता.
तत्पुर्वी त्यांनी दोनदा शहराचे महापौरपद भुषविले होते. तसेच त्यांचे वडील विधानपरिषदेचे सदस्य आहेत. तर पत्नी शितल जगताप यांही नगरसेविका आहेत. महापालिकेत राष्ट्रवादीचे १८ नगरसेवक आहेत.
नगर शहरातूनच जनतेनी नाकारल्याने आगामी काळात विधानसभा निवडणुकी ही आ.संग्राम जगताप यांना धोक्याची ठरणार आहे.
- पैशांचा अक्षरश: पाऊस पडेल, वास्तुशास्त्रात सांगितलेले ‘हे’ उपाय एकदा करून तर बघा!
- जगातील सर्वात महाग मांस मिळतं ‘या’ देशात, किंमत ऐकून थक्क व्हाल! भारतातही वाढलीये याची जबरदस्त मागणी
- हिमाचल प्रदेश विनाशाच्या दारात?, 100 वर्षांत इतका धोकादायक बदल झाला की…, सत्य ऐकून थरकाप उडेल!
- 70% मुस्लिम समुदाय असूनही ‘या’ देशात हिजाब-बुरख्यावर बंदी, महिलांनी नियम तोडल्यास मिळते शिक्षा!
- DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकार किती पगार देते? आकडा ऐकून थक्क व्हाल!