अहमदनगर :- घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत उभ्या असलेल्या शिक्षकाला बळजबरीने चारचाकी वाहनात बसून मारहाण करत त्यांच्याकडील रोख रक्कम, सोन्याची अंगठी व इतर कागदपत्रे असा ३७ हजार रुपयांचा ऐवज बळजबरीने काढून घेण्यात आला.
ही घटना २४ मे रोजी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास सोलापूर महामार्गावरील वाळूंज बायपास शिवारात घडली. सुरेश नीळकंठ उगले (३५, घोगरगाव, ता. श्रीगोंदे) असे शिक्षकाचे नाव आहे.

याप्रकरणी भिंंगार कॅम्प पोलिसांनी तीन अनोळखी व्यक्तींविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. उगले यांना गाडीत बसवल्यानंतर फायटरने मारहाण करण्यात आली. त्यानंतर डोळ्याला रुमाल बांधून त्यांना गाडीच्या खाली उतरून दिले.
- इंडिया किंवा फक्त हिंदुस्थानच नव्हे, तब्बल 12 नावांनी ओळखला जातो भारत देश! फक्त बुद्धिमान लोकांनाच माहित असतील ही प्राचीन नावे
- भारताची नवी रणनीती! सिंधू, झेलम, चिनाब नदीवरील ‘हा’ प्रकल्प पाकिस्तानला हादरवणार
- गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात ‘हे’ अन्नपदार्थं खाणं टाळाच, बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो गंभीर परिणाम!
- रेल्वे प्रवाशांची सुरक्षा कोण पाहतो?, जाणून घ्या GRP आणि RPF यांच्यातला फरक आणि जबाबदाऱ्या!
- अर्जुनाचं ‘गांडिव’ आता हवाई लढाईत! चीनच्या PL-15 पेक्षा प्रगत क्षेपणास्त्र भारताकडे, मॅक 4.5 वेगाने करणार हल्ला