Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

दिलीप गांधीना संपविण्यासाठी विरोधक सरसावले !

अहमदनगर :- माजी खा. दिलीप गांधी यांची खासदारकी गेली, आता त्यांच्याकडे भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष पद आहे. तेही काढून घेण्याचे घाटत आहे. त्यानंतर अर्बन बँकेत पानीपत करण्याची तयारी गांधी विरोधकांनी चालवली आहे.

नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होणार आहे. नगरमधील वैभवशाली आणि 109 वर्षाचा वारसा असलेल्या या बँकेचे नेतृत्व माजी खासदार दिलीप गांधी यांच्याकडे असून त्यांच्या ताब्यातून बँक खेचून आणण्याकरीता गांधी विरोधक सरसावले आहेत.

अर्बन बँक निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरूवात होण्यापूर्वीच ‘बँक बचाव कृती समिती’च्या नावाखाली विरोधक एकवटत असल्याचे चित्र आहे. माजी संचालक राजेंद्र गांधी, वसंत लोढा हे गांधी विरोधात वातावरण गरम करत आहेत.

2014 मधील निवडणुकीत 18 संचालक असलेल्या बँकेची धुरा सभासदांनी एकतर्फी दिलीप गांधी यांच्या हातात सोपविली. विरोधी पॅनलचा सुपडा साफ करत गांधी पॅनलचे सगळे संचालक विजयी झाले.

त्यामुळे गांधी यांना विरोध करणार एकही संचालक बॉडीत नाही. गतवेळी अ‍ॅड. अभय आगरकर आणि अ‍ॅड. अशोक कोठारी यांनी गांधी विरोधी पॅनलची जुळवाजुळव करत नेतृत्व केले होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button