Ahmednagar NewsAhmednagar SouthBreakingMaharashtra

दहा लाख रुपये न दिल्याने उच्चशिक्षित पतीकडून माहेरी आलेल्या पत्नीस मारहाण !

श्रीगोंदा : हुंड्यासारख्या वाईट प्रथेमुळे अनेक विवाहित महिलांना आपले प्राण गमवावे लागले, त्यामुळे हुंडाबळी सारखे कायदे आमलात आले.

परंतु अजूनही हुंड्यासाठी अनेक विवाहितांचा सासरच्यांकडून शारीरिक, मानसिक छळ केल्याच्या घटना घडत आहेत. अगदी उच्चशिक्षित लोक देखील याला अपवाद नाहीत.

नवरा अभियंता, दीर अभियंता सासु सासरे दोघेही शिक्षक असे सर्व कुटुंब उच्चशिक्षित असूनही सुनेच्या घरचे दहा लाख रुपये देत नाहीत. म्हणून सुनेला त्रास दिला जात असे.

सासरच्या वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून माहेरी आईवडिलांकडे राहणाऱ्या एका विवाहितेला पतीने मारहाण केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात घडली.

या घटनेबाबत मारहाण झालेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अभियंता पती,दीर,शिक्षक सासू,सासरे यांच्याविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात हुंड्यासाठी छळ व मारहाण केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी मारहाण करणारा पती,दीर व सासरा यांना तात्काळ ताब्यात घेतले आहे.. याबाबत माहिती अशी की श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी कुटुंबातील मुलीचा सुमारे तीन वर्षांपूर्वी पारनेर तालुक्यातील एका सुशिक्षित कुटुंबातील मुलाशी विवाह झाला.

मुलगा अभियंता, मुलाचा भाऊ अभियंता दोघेही खासगी कंपनीत नोकरीला, मुलाचे आई वडील शिक्षक अशा सुशिक्षीत व सधन कुटुंबात विवाह झाला होता.

मुलगी सुशिक्षीत कुटुंबात गेल्यामुळे मुलीचे घरचे आनंदात होते. परंतु त्यांचा आनंद फारकाळ टिकला नाही. लग्न झाल्यानंतर काही दिवसांतच सासरकडच्या लोकांनी या शेतकरी कुटूंबातील मुलीला जागा घेण्यासाठी पैशांची मागणी केली.

मुलगी नांदायची तिला काही त्रास नको या भाबड्या आशेने दबावाखाली मुलीच्या शेतकरी वडिलांनी कांदा विकून मिळालेले पाच लाख रुपये मुलीच्या सासरच्यांना दिले.

त्यानंतर काही दिवस सुरळीत गेल्यानंतर सदर जागेवर घर बंधायचे असून,त्यासाठी पुन्हा दहा लाख रुपये माहेराहुन आन यासाठी मुलीच्या सासरच्यांनी तिचा छळ करायला सुरुवात केली.

परंतु आपले वडील शेतकरी असून ते एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाहीत, असे मुलीने सांगताच त्या मुलीला उपाशी ठेवणे तिचा शारीरिक, मानासिक छळ केला जात असे.

हा छळ असाह्य झाल्यामुळे ही मुलगी श्रीगोंदा तालुक्यातील आपल्या माहेरी येऊन आपल्या आई वडिलांसोबत राहू लागली.

परंतु पैशांच्या हव्यास्याने आंधळ्या झालेल्या मुलीच्या सासरच्या मंडळीनी दि.३०रोजी दुपारी आपल्या संबंधित मुलीच्या वडीलांच्या घरी येवून तू दहा लाख रुपये का आणले नाहीस, असे म्हणून तीला तिच्या माहेरच्या मंडळीसमोरच मारहाण केली.

आपल्या बहिणीला डोळ्यादेखत मारहाण होत असल्याचे पाहून या मुलीचा भाऊ मध्ये पडला असता, त्यालादेखील या मुलीच्या सासरच्यांनी मारहाण केली.

या प्रकारानंतर सदर मुलीने थेट श्रीगोंदा पोलिस स्टेशन गाठले आणि पैशांसाठी मारहाण करणाऱ्या सासरच्या या उच्चशिक्षित मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button