जामखेड :- पंचायत समितीच्या हातपंप दुरुस्ती करणाऱ्या गाडीखाली चेंगरून पाच वर्षांच्या अनुजा गणेश कोल्हे (राजुरी) या चिमुकलीचा जागेवरच मृत्यू झाला.
या घटनेने राजुरी परिसरात शोककळा पसरली. राजुरी हे गाव शिर्डी-हैदराबाद महामार्गावर जामखेडपासून दहा किलोमीटर अंतरावर आहे.

अनुजा ही रविवारी दुपारी चार वाजता कोल्हेवस्तीवर रस्ता ओलांडत असताना तालुका पंचायत समितीची हातपंप दुरुस्तीची गाडी जामखेडकडे येत असताना ही चिमुरडी चेंगरली गेली.
या घटनेमुळे चालक घाबरून पळून गेला. अनुजाला ताबडतोब ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही.
- वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्यावरील कर्ज फेडण्याची जबाबदारी मुलांवर असते का ? कायदा काय सांगतो ?
- श्रीगोंदा आगाराची कर्जत-बेलवंडी एसटी बस बंद केल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल, बस सुरू करण्याची नागरिकांची मागणी
- अहिल्यानगर जिल्ह्यात होणाऱ्या कोतवाल भरतीत दिव्यांगांना आरक्षण जाहीर करण्याची मागणी, तहसिलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
- बँक ऑफ बडोदाच्या 400 दिवसाच्या एफडी योजनेत 4 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर
- आमदार रोहित पवारांची कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ता संपुष्टात, उपसभापती कैलास वराट यांच्याविरोधातील अविश्वास ठराव १२ विरुद्ध ० मतांनी मंजूर