श्रीगोंदे :- तालुक्यातील पिसोरेखांड येथील भरत नारायण कराळे (२६) या तरुणाचा गळ्याला फास अडकवलेल्या स्थितीतील मृतदेह देऊळगावच्या हद्दीत शुक्रवारी आढळला.
दरम्यान मृत्यूपूर्वी त्याने गावातील एक ग्रामपंचायत सदस्याच्या विरोधात मारहाण केल्याची तक्रार श्रीगोंदे पोलिसांत दिली होती.


या तरुणाचा मृत्यू संशयास्पद असल्याने पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. पिसोरेखांड येथील भरत नारायण कराळे हा तरुण खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता.
सामाजिक कामातही तो सहभागी होत असे. काही दिवसांपूर्वी ग्रामसेवक आणि या तरुणात शाब्दिक वाद झाले होते.
गावात पाणी टंचाई असल्याने आमच्या भागात पाण्याचा टँकर द्यावा, अशी मागणी केल्याने ग्रामपंचायत सदस्याने भरतला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती.

याबाबत ६ जूनला संध्याकाळी या तरुणाने फिर्याद दिली होती. त्यानंतर गायब झालेल्या भरतचा मृतदेह शुक्रवारी सकाळी देऊळगाव हद्दीत गळ्याला फास लावलेल्या स्थितीत स्थानिक नागरिकांनी पाहिला.
पोलिसांनी मृतदेह पुण्यातील ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. मृताच्या नातेवाईकांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
- Post Office च्या आरडी योजनेत 10,000 रुपयाची गुंतवणूक केल्यास 60 महिन्यांनी किती रिटर्न मिळणार?
- ‘या’ देशांमध्ये मुली आयुष्यभर सिंगलच राहतात, कारण एवढं विचित्र की विश्वास बसणार नाही!
- जपानच्या इंटरनेट स्पीडने इतिहास घडवला! 1 सेकंदात तब्बल 10 लाख GB डेटा, सेकंदात नेटफ्लिक्सची अख्खी लायब्ररी डाउनलोड
- 14 जुलै रोजी ‘ह्या’ राज्यातील खाजगी आणि सरकारी बँकांना सुट्टी राहणार ! 12 ते 31 जुलै दरम्यान बँका 10 दिवस बंद राहणार, पहा सुट्ट्याची यादी
- आणखी 4 दिवस थांबा ! वाईट कळ संपणार, 16 जुलै 2025 पासून ह्या राशीच्या लोकांना मिळणार जबरदस्त यश