जामखेड :- नगरपरिषदेच्या प्रभाग १४ च्या पोटनिवडणुकीसाठी अर्जांच्या छाननीत सातपैकी एबी फार्म नसल्याने एक अर्ज बाद झाला. भाजप, काँग्रेस व शिवसेना यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तीन अपक्ष उमेदवारांची भर पडल्याने लढत रंगतदार होणार आहे.
सुरुवातीला भाजपतर्फे पठाण सलमा शाकीरखान यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता. परंतु पक्षाचा एबी फार्म पठाणऐवजी शेख जाकीया आयुब यांना देण्यात आला. त्यामुळे पठाण यांचा अर्ज अवैध ठरला. या राजकीय खेळीमुळे एक गट कमालीचा नाराज झाला आहे.

पालकमंत्री राम शिंदे यांच्या शब्दाला त्यांच्या कार्यकर्त्यांनी केराची टोपली दाखवली. शिवसेनेच्या वतीने तालुकाप्रमुख संजय काशिद यांची पत्नी रोहिणी यांनी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेसच्या वतीने शेख परवीन सिरोजद्दीन यांनी पक्षाचा एक व अपक्ष एक असे दोन अर्ज दाखल केले आहेत.
मैनाबाई ज्ञानदेव सदाफुले व छाया संतोष गुंदेचा यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुहास जगताप यांनी अर्ज स्वीकारले. अर्जाची छाननी होऊन सहा उमेदवार निवडणूक रिंगणात उरले आहेत.
- इंडिया किंवा फक्त हिंदुस्थानच नव्हे, तब्बल 12 नावांनी ओळखला जातो भारत देश! फक्त बुद्धिमान लोकांनाच माहित असतील ही प्राचीन नावे
- भारताची नवी रणनीती! सिंधू, झेलम, चिनाब नदीवरील ‘हा’ प्रकल्प पाकिस्तानला हादरवणार
- गरोदरपणाच्या पहिल्या 3 महिन्यात ‘हे’ अन्नपदार्थं खाणं टाळाच, बाळाच्या मेंदूच्या विकासावर होतो गंभीर परिणाम!
- रेल्वे प्रवाशांची सुरक्षा कोण पाहतो?, जाणून घ्या GRP आणि RPF यांच्यातला फरक आणि जबाबदाऱ्या!
- अर्जुनाचं ‘गांडिव’ आता हवाई लढाईत! चीनच्या PL-15 पेक्षा प्रगत क्षेपणास्त्र भारताकडे, मॅक 4.5 वेगाने करणार हल्ला