रन विथ फॅमिली उपक्रमास नगरकरांचा उत्सफुर्त प्रतिसाद

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर  – व्यायामाची आवड निर्माण होऊन संपुर्ण कुटूंबाचे आरोग्य निरोगी व स्वस्थ्य राहण्यासाठी नगर रायझिंग ग्रुपच्या वतीने रविवारी आयोजित करण्यात आलेल्या रन विथ फॅमिली या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत नगरकर उत्सफुर्तपणे धावले.

उत्साह व जोशपुर्ण वातावरणात पार पडलेल्या या मॅरेथॉनमध्ये युवक-युवतींसह अबालवृध्द मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

पहाटे 6 वाजल्यापासूनच बालिकाश्रम रोड येथील महालक्ष्मी उद्यानात बाळगोपालांसह संपुर्ण कुटूंबीय जमण्यास सुरुवात झाली.

जमलेल्या गर्दीने भल्या सकाळी उद्यान फुलून दिसत होते. प्रारंभी संगीताच्या तालावर व्यायाम करण्यात आले. राष्ट्रगीताने या स्पर्धेची सुरुवात झाली.

महालक्ष्मी उद्यान पासून सुरु झालेली ही मिनी मॅरेथॉन 3 व 5 कि.मी. या दोन गटात पार पडली. मोठ्या उत्साहाने सहभागी झालेल्या रनर्सनी वरील अंतर पार केले.

तसेच एक दिव्यांग युवकाने देखील या स्पर्धेत सहभाग नोंदवून उपस्थितांना प्रेरित केले. स्पर्धा पुर्ण करणार्या रनर्सना नगर रायझिंगच्या वतीने आकर्षक बॅच देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

मॅरेथॉनला चालना देऊन, सदृढ आरोग्यासाठी नागरिकांमध्ये व्यायामाची आवड निर्माण होण्याच्या हेतून नगर रायझिंगच्या वतीने दर महिन्याला मिनी मॅरेथॉनचे आयोजन केले जात आहे.

या उपक्रमांतर्गत संपुर्ण कुटूंबीयांसाठी मॅरेथॉन ठेवण्यात आली होती. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नगर रायझिंगच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

Leave a Comment