Ahmednagar CityAhmednagar NewsBreakingMaharashtra

अनिल राठोड विधानसभेसाठी फायनल !

अहमदनगर :- शिवसेनेचे पदाधिकारी व नगरसेवकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विधानसभेसाठी माजी आमदार अनिल राठोड यांच्या उमेदवारीचा एकमुखी ठराव करण्यात आला.

पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन राठोड यांना उमेदवारी देण्याची मागणी सेनेच्या शिष्टमंडळाकडून करण्यात येणार आहे.

माजी शहरप्रमुख संभाजी कदम हे शहराचे भावी आमदार असल्याचा उल्लेख करीत त्यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर अप्रत्यक्षरित्या उमेदवारीसाठी लॉबिंग सुरू केली या बातमीने शिवसेना वर्तुळात खळबळ उडाली होती.

यासंदर्भात तातडीने बैठक घेण्यात आली. विधानसभेसाठी आपण इच्छुक नसल्याचे संभाजी कदम यांनी बैठकीत स्पष्ट केल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्या समर्थकांकडून कदम हे ‘भावी आमदार’ अशा पोस्ट सोशल मीडियाव्दारे व्हायरल केल्या होत्या.

यावर या बैठकीत चर्चा झाली. नगरसेवकांनी आपल्या कार्यकत्र्यांना आवर घालावा, असेही यावेळी सूचित करण्यात आले.

बैठकीस दक्षिण जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख दिलीप सातपुते, संभाजी कदम यांच्यासह दोन – तीन नगरसेवक वगळता उर्वरीत सर्व नगरसेवक उपस्थित होते.

उपनेते अनिल राठोड हेही या बैठकीत उशिरा आले होते. विधानसभा निवडणुकीत अनिल राठोड हेच उमेदवार असतील, असा ठराव नगरसेवकांनी या बैठकीत केला.

File Photo

तसेच येत्या आठ दिवसात नगरसेवक, पदाधिकारी, शाखाप्रमुख यांची बैठक घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे.

उध्दव ठाकरे सध्या दुष्काळी दौ- यावर आहेत. हा दौरा संपल्यानंतर शिष्टमंडळाव्दारे ठाकरे यांना भेटून अनिल राठोड यांच्या उमेदवारीची मागणी करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

अनिल राठोड हेच उमेदवार असतील, आपण इच्छुक नाहीत, कार्यकर्त्यांनी पोस्ट टाकल्या आहेत, असे कदम यांनी सांगितल्याचे समजते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button