Ahmednagar NewsBreakingMaharashtra

मुख्यमंत्री व विखेंचे प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम !

जामखेड :- शेतकरीविरोधी सरकार पुन्हा एकतर्फी कसे येते, याचा विचार सर्वसामान्य मतदारांनी करणे आवश्यक आहे;

अन्यथा सर्वसामान्यांसाठी काम करणाऱ्या चळवळी नष्ट होतील, असे प्रहार संघटनेचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. 

आमदार कडू यांची जामखेड येथील बाजारतळावर शनिवारी सकाळी सभा झाली. त्या आधी वृक्ष दिंडी काढण्यात आली. 

आमदार कडू यांनी विखे कुटुंबावर सडकून टीका केली. विरोधी पक्षनेतेच जर भाजपला साथ देत असतील, तर सरकारकडून काय अपेक्षा करणार,

असे सांगून आमदार कडू म्हणाले, निवडणुकीत काँग्रेस व भाजपचे साटेलोटे होते. मुख्यमंत्री व विखेंचे प्रेम म्हणजे राधाकृष्णाचे प्रेम आहे.

विखेंची अख्खी खानदान भाजपत गेली, याचा काय अर्थ आहे, जर तुमच्यामागे मोदी असतील, तर आमच्यामागे छत्रपती आहेत.

यावेळी बच्चू कडू यांनी ऊस प्रश्न, पाणी, दुष्काळ आदी महत्त्वाच्या मुद्यांवरून सरकारला धारेवर धरले.

ज्या नगरमध्ये उसाच्या भावासाठी लढणा-यांवर गोळ्या चालवल्या जातात त्याच नगरमध्ये कमळ कसे खुलते? असा प्रश्न बच्चू कडू यांनी केला.

तसेच भाजप सरकार हे केवळ जाती-धर्माच्या मुद्यावर राजकारण करत असून मूळ मुद्यांपासून लांब पळत आहे असेही ते पुढे म्हणाले. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घ्यायचे आणि कृती मात्र हैवानाची करायची.

अशा लोकांना निवडून देण्याला तुम्हीही तितकेच जबाबदार आहात. इथे भाषणात टाळ्या वाजवता पण मत मात्र भाजपला देता, अशी खंतही बच्चू कडू यांनी व्यक्त केली.


Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button