संगमनेर :- तालुक्याचे राजकारण अतिशय सरळ आहे. मी कधी कोणाचे वाईट चिंतले नाही. मात्र, बुध्दिभेद करणारे काही लोक येथे येत आहेत.
त्यांचा जनतेने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. तालुक्याच्या विकासाठी सर्वांनी एकत्रित राहायला हवे. निळवंडे धरणाच्या कामात ज्यांचे कधीही योगदान नव्हते असे लोक आता श्रेयासाठी सरसावले आहेत.

धरणावरुन राजकारण सुरु झाले आहे, असे काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
थोरात यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर रविवारी त्यांचा संगमनेरकरांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळा ते बोलत होते.
श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गा तांबे आदी यावेळी उपस्थित होते.
थोरात म्हणाले, दुष्काळी भागाच्या सिंचनाचा व पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण निळवंडे पूर्ण केले. बोगद्यासह कालव्यांचीदेखील काही प्रमाणात कामे केली,
मात्र गेल्या पाच वर्षांत सत्ताधाऱ्यांकडून काहीच काम झाले नाही. आता निवडणुकांच्या तोडावर बैठका घेतल्या जात आहेत. या बैठकांना आपल्याला डावलण्यात आले.
ज्यांचे योगदान नाही ते श्रेयासाठी सरसावले आहेत. अकोलेकरांचा प्रश्न चर्चेने सोडवला गेला पाहिजे, ही आपली मागणी होती. निळवंडे कालव्यासाठी कृती समितीचेही योगदान मोठे आहे,
मात्र काही लोक त्यांनादेखील डावलत असून येथील जनतेच्या मनात दुष्काळ, पाण्याचे भांडवल करुन विष पेरत आहेत. त्यांना वेळीच रोखण्याची गरज आहे.
संगमनेरचा विकास, सहकार, बाजारपेठ त्यांना बघवत नाही. हे सर्व मोडण्याचा त्यांचा डाव आहे. काँग्रेस नेतृत्व आणि पक्षाने आपल्यावर मोठा विश्वास दाखवला.
काँग्रेस गोरगरिब, वंचितांचा पक्ष आहे. लवकरच हा पक्ष पुन्हा भरारी घेईल. लोकशाही आणि राज्यघटना टिकण्यासाठी काँग्रेसचाच विचार टिकणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
- बँकेपेक्षा जास्त परतावा देतो” म्हणत शेअर मार्केटच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक
- शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळणे अभिमानास्पद ! मंत्री विखे पाटील यांचे गौरवोद्गार
- खाटूश्याम आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! 14 जुलैपासून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?
- निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सुटणार : आ. कर्डिले
- जिथे रावणाचे विचार होते तिथे वारकऱ्यांमुळे प्रभू रामांच्या विचारांची पेरणी : आमदार डॉ. किरण लहामटे