श्रीरामपूर – जन्मदात्या आईलाच मुलगा व सुनेकडून मारहाण झाल्याची संतापजनक घटना श्रीरामपूर तालुक्यात घडली आहे.
तालुक्यातील भामाठाण येथे राहणारी वृद्ध महिला सुंदराबाई जयराम तांदळे, वय ६५ यांना आरोपी बाळासाहेब जयराम तांदळे

याने घरगुती कारणातून बेदम मारहाण करुन डोके फोडले तर त्याची पत्नी सौ. निर्मला बाळासाहेब तांदळे हिने विळी फेकून मारुन जखमी केले.

मुलगा व सुनेने सुंदराबाई तांदळे यांना शिवीगाळ करत जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
जखमी सुंदराबाई जयराम तांदळे यांनी वरीलप्रमाणे फिर्याद दिल्याने
आरोपी बाळासाहेब जयराम तांदळे, सौ. निर्मला बाळासाहेब तांदळे, दोघे रा. भामाठाण, ता. श्रीरामपूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि खान यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ गायकवाड हे पुढील तपास करीत आहेत.
- Bigg Boss 19 : राज कुंद्रा ते मुनमुन दत्ता…, ‘या’ बड्या स्टार्सने नाकारला सलमान खानचा बिग बॉस 19 शो!
- सापांचा धोका वाटतो का ? मग घरात ‘या’ लिक्विडचा वापर करा, सापांचा धोका कायमचा मिटणार, कस तयार करणार लिक्विड?
- अवघ्या 9999 रुपयांत खरेदी करा 5200mAh बॅटरी, 6GB रॅम आणि AI फीचर्सवाला स्मार्टफोन! उद्या पहिली सेल
- ‘हे’ आहेत Sony LIV चे टॉप रेटेड 9 जबरदस्त वेब शो, घरबसल्या बिंजवॉच करा!
- ICC कसोटी क्रमवारीत सर्वाधिक काळ नंबर-1 राहिलेले गोलंदाज कोण?, पाहा यादी!