नगर :- तालुक्यातील घोडकवाडी, घोसपुरी भागात राहणारा तरुण शिवदास रामदास भोलसे, वय २५ याला व त्याचे वडील रामदास भोसले या दोघांना हुंड्याचे पैसे देणे बाकी असल्याने ते पैसे शिवदास भोसले याचा मेव्हणा आरोपी क्र. १ याच्याकडे दिल्याने ते पैसे सासरे यांच्याकडे पोहोच न झाल्याने वाद झाला.
दोघा आरोपींनी शिवदास भोसले व त्याचे वडील रामदास भोसले यांना लोखंडी गज, लोखंडी पाईपने व पिस्तुलने मारहाण करुन शिवीगाळ केली.
रामदास भोसले यांच्या हनुवटीवर पिस्तुल लावून त्यांना जिवंत सोडायचे नाही, अशी धमकी दिली. जखमी तरुण शिवदास रामदास भोसले याने याप्रकरणी नगर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन मारहाण करणारे आरोपी विजय गजानन काळे, साहेवा गजानन काळे दोघे रा. दहिगाव साकत, ता. नगर यांच्याविरुद्ध नगर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल कण्यात आला आहे.
- बिबट्या दिवसाढवळ्या फिरतोय, पण प्रशासन झोपेत ? नागरिकांमध्ये संताप
- अहिल्यानगर बाजार समितीत डाळिंबांना १६ हजारांपर्यंत भाव
- 7,000 किमी लांब ‘ही’ नदी 9 देशांमधून वाहते, पण आजपर्यंत तिच्यावर एकही पूल बनला नाही; कारण थक्क करणारे!
- बळीराजा सुखी होऊ दे! पांडुरंगाच्या चरणी अक्षय कर्डिले यांची भावनिक प्रार्थना
- अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात विभागात भरती, १३७ जागांसाठी १३३८ अर्ज