Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar SouthBreaking

चोरीची फिर्याद देणाराच निघाला खरा आरोपी !

पारनेर :- सुपे रस्त्यावरील कुरियर कंपनीत झालेल्या चोरीची फिर्याद देणाराच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. पोलिसांनी फिर्यादी किरण कदमसह त्याचा साथीदार प्रशांत शिंदे याला अटक करून त्यांच्याकडून ४७ हजार ५०० रुपयांची रोकड, तसेच ८० हजारांच्या वस्तू हस्तगत केल्या.

९ जूनच्या रात्री इॅ कॉम एक्स्प्रेस या गाळयाचे शटर उचकटून लॉकरमधील १ लाख १४ हजारांची रोकड, तसेच ग्राहकांना देण्यासाठी आलेल्या १ लाख ६७ हजारांच्या वस्तू चोरीस गेल्याची फिर्याद सुपरवायझर किरण कदम याने दिली होती.

उपविभागीय पोलिस अधिकारी मनीष कलवानीया, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळाची कसून तपासणी केली. नंतर पारनेर पोलिस ठाण्याची विशेष शाखा व पोलिस अधीक्षक कार्यालयातील पथकाकडे तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली.

फिर्यादी कदम याच्या देहबोलीवरून तपासी पथकाने त्याच्याभोवतीच लक्ष केंद्रित केले. त्यांचा संशय खरा ठरला. कदमला दारूचे व्यसन असून कंपनीकडे जमा झालेली मोठी रक्कम त्याने दारूसाठी खर्च केली. दारूसाठी त्याने कर्जही उचलले होते.

ग्राहकांना वस्तू पोहोचवल्यानंतर ती रक्कम परस्पर खर्च केल्यामुळे कंपनीकडून आलेल्या वस्तू व जमा रकमेत मोठी तफावत निर्माण झाली होती. कंपनीकडून दबाव वाढल्याने कदम याने सहकारी प्रशांत शिंदे याला विश्वासात घेत चोरीचा बनाव रचला.

कार्यालयात जमा झालेली रक्कम ४७ हजार ५०० तसेच ८० हजारांच्या वस्तू दोघांनी आपल्या घरी नेऊन ठेवल्या. रात्री शटर उचकटून लॉकर तोडण्यात आल्याचा अभास निर्माण केला. पोलिस चौकशीत विसंगती येत असल्याने पथकाने कदम याच्यावर प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर

त्याने आपणच शिंदे याच्या मदतीने चोरी केल्याची कबुली दिली. कदमकडून रोकड व एक मोबाइल, तर शिंदे याच्या जामगाव येथील घरातून चार मोबाइल, लेडीज ड्रेस असा एकूण १ लाख २७ हजार ५०० रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button