अहमदनगर :- लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांनी त्यांचा अंतिम खर्च जिल्हा निवडणूक शाखेकडे सादर केला आहे.
यात सर्वाधिक 64 लाख रुपये खर्च नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला असून
त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीचे आ. संग्राम जगताप यांचा निवडणूक खर्च 61 लाख रुपये आहे.

शिर्डीतील उमेदवार शिवसेनेचे उमेदवार खा. सदाशिव लोखंडे व आणि काँग्रेसचे उमेदवार आ. भाऊसाहेब कांबळे या दोघांचाही खर्च समान म्हणजे 59 लाख रुपये आहे.
23 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागून नगर मतदारसंघातून भाजपचे डॉ. विखे, तर शिर्डी मतदारसंघातून शिवसेनेचे खा. लोखंडे यांचा विजयी झाले.
निकालानंतर महिनाभरात अंतिम खर्च सादर करावा, अन्यथा निवड झालेल्या उमेदवारांची निवड रद्द होते आणि जे पराभूत आहेत, त्यांनाही पुढे साडेपाच वर्षे निवडणूक लढवता येत नाही,
असे निवडणूक आयोगाने या उमेदवारांना कळवले होते. त्यानुसार सर्वच उमेदवारांनी 22 जूनपूर्वी अंतिम खर्च सादर केला.

नगर दक्षिण मतदारसंघात डॉ. विखे यांनी सर्वाधिक 64 लाख 49 हजार 332 एवढा खर्च झाल्याचे सांगितले असून त्यानंतर आ. संग्राम जगताप यांनी 61 लाख 8 हजार 138 एवढा खर्च नोंदवला आहे.
अपक्ष उमेदवार संजीव भोर 6 लाख 90, कमल सावंत 4 लाख 41 हजार, भास्कर पाटोळे 1 लाख, आबिद शेख 1 लाख 40 हजार, ज्ञानदेव सुपेकर 1 लाख 15 हजार, नामदेव वाकळे 1 लाख 55 हजार, सुधाकर आव्हाड यांनी 3 लाख 53 हजार खर्च नोंदवला आहे.

त्याच प्रमाणे शिर्डी मतदारसंघात काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे यांनी 59 लाख 79 हजार 132, तर शिवसेनेचे सदाशिव लोखंडे यांनी 59 लाख 73 हजार 183 रूपये एवढा खर्च केला आहे.
अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी 2 लाख 81 हजार, बन्सी सातपुते यांनी 7 लाख 42 हजार, सुरेश जगधने 4 लाख 39 हजार, प्रकाश आहेर 2 लाख 93 हजार, संजय सुखदान 14 लाख 46 हजार, प्रदीप सरोदे यांनी 8 लाख 52 हजार खर्च नोंदवला आहे.
- अंबानी कुटुंबाला रिलायन्समधून किती पगार मिळतो?, लाखो नव्हे कोटींमध्ये जातो हा आकडा!
- लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी ; जून महिन्याचा हफ्ता जमा होतोय, पण जुलैचा हफ्ता कधी ? समोर आली मोठी अपडेट
- हृदयाच्या आरोग्यासाठी अमृत आहेत ‘या’ देसी गोष्टी, कोलेस्टेरॉलची पातळी झपाट्याने कमी करतात!
- Bank Of Baroda च्या 444 दिवसांच्या एफडी योजनेत 4 लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ? वाचा सविस्तर
- श्रावण महिन्यात ‘या’ अन्नपदार्थांचे सेवन का टाळले जाते?, जाणून घ्या शास्त्रीय कारण!