अहमदनगर :- आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याकडून लढू इच्छिणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे.
चांगले उमेदवार शोधण्यासह ज्यांना स्वतःहून विधानसभा लढवण्याची इच्छा आहे, अशांचे अर्ज संकलनही सुरू केले आहे.
येत्या १ जुलैपर्यंत पक्षाच्या प्रदेश कार्यालयात वा जिल्हास्तरावर जिल्हाध्यक्षांकडे उमेदवारी मागणीचे अर्ज देण्यास सांगण्यात आले आहे.
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात मतदारसंघ निहाय उमेदवारांची नावे अंतिम करण्याचे पक्षाचे नियोजन असल्याचे सांगण्यात आले.
ऑनलाइन अर्ज करण्याचीही सुविधा
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज प्रदेश राष्ट्रवादीकडे दाखल करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी केले आहे.
येत्या १ जुलैपर्यंत उमेदवारी असे अर्ज करावयाचे असून त्यांची छाननी ३ जुलैला होऊन जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत इच्छुक उमेदवारांची यादी अंतिम केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उमेदवारी अर्ज प्रत्येक जिल्ह्यामध्ये संबंधित जिल्हाध्यक्षांकडेही सादर करता येऊ शकतो किंवा पक्षाच्या संकेतस्थळावर ऑनलाइनवरही अर्ज स्वीकारले जाणार आहेत.
दरम्यान, उमेदवारी अर्ज इच्छुक उमेदवारांनी पक्षाच्या जिल्हा कार्यालयाकडे ई-मेलद्वारे थेट अर्ज [email protected] वर पाठवण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे.
- भारतातील गावांपेक्षाही लहान, ‘हे’ आहेत जगातील सर्वात लहान 7 देश! पण श्रीमंती, सौंदर्य आणि पर्यटनात सर्वात पुढे
- कोणतंही कर्ज न घेता खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं घर, जाणून घ्या आर्थिक तज्ज्ञांचा 5/20/30/40 फॉर्म्युला!
- प्रेमात अडथळा ठरत असलेल्या पतीला पत्नीनं प्रियकराच्या मदतीने केली लाकडी दांडक्याने मारहाण, राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल
- आज आणि उद्या राज्यातील शिक्षकांची शाळा बंद आंदोलन, पण शाळेला सुट्टी राहणार नाही, शिक्षण विभागाचा नवा आदेश
- अहिल्यानगर जिल्ह्यात पुन्हा पावसाला सुरूवात, शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तर दुबार पेरणीचे संकट टळले