अहमदनगर :- बोल्हेगाव हा ग्रामीण भाग म्हणून ओळखला जातो. या भागाला विकासकामातून शहरीकरणाचे रूप देण्याचे काम केले. निवडणूका या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी असतात.
माझ्या गेल्या साडे चार वर्षांत शहरात केलेल्या विकास कामांचा लेखा-जोखा जनतेसमोर आहे. ज्यांनी विकासकामे केली नाहीत, त्यांना मत मागण्याचा अधिकार नाही.
नगरसेवक कुमारसिंह वाकळे यांनी प्रभागाच्या विकासकामासाठी पाठपुरावा केल्यामुळे प्रभागाचा विकास झाला आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
प्रभाग क्रमांक ७ मधील बोल्हेगाव गावठाण येथील भैरवनाथ मंदिर परिसरात उद्यान निर्मितीच्या व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करताना जगताप बोलत होते.
जगताप म्हणाले, शेवटच्या घटकापर्यंत विकासकामे घेऊन गेलो आहे. चैतन्य हॉटेल ते गांधीनगर पर्यंतच्या मूळ रस्त्याचे काम मार्गी लावले.
सावेडी गाव ते बोल्हेगाव रस्त्याचे काम मार्गी लावले. दळणवळणाचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली व लोकवस्ती वाढली.
विकासाचा अजेंडा हाच माझा ध्यास आहे. नगर शहरात आता विकास कामावर चर्चा सुरू झाली आहे. गेली पाच वर्षे राज्य शासनाकडे विविध विकास कामासाठी पाठपुरावा केला व निधी प्राप्त झाला. सर्वांना बरोबर घेऊन विकासाची गुढी उभी करायची आहे.
- बँकेपेक्षा जास्त परतावा देतो” म्हणत शेअर मार्केटच्या नावाखाली वीस लाखांची फसवणूक
- शिवकालीन किल्ल्यांना जागतिक वारसाचा दर्जा मिळणे अभिमानास्पद ! मंत्री विखे पाटील यांचे गौरवोद्गार
- खाटूश्याम आणि तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर ! 14 जुलैपासून चालवली जाणार नवीन एक्सप्रेस, महाराष्ट्रातील कोणकोणत्या स्थानकावर थांबणार ?
- निळवंडेच्या उजव्या कालव्यातून मंगळवारी पाणी सुटणार : आ. कर्डिले
- जिथे रावणाचे विचार होते तिथे वारकऱ्यांमुळे प्रभू रामांच्या विचारांची पेरणी : आमदार डॉ. किरण लहामटे