केडगावमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा तडीपार गुंडावर खुनी हल्ला

Published on -

अहमदनगर – तडीपार असतानाही केडगावमध्ये फिरणारा गुंड मनोज कराळे व शिवसेना शिवसेना कार्यकर्ता सुनील सातपुते यांच्यात सोमवारी (दि.1) रात्री हाणामारी झाली.

तडीपार कराळे हा गंभीर जखमी झाला आहे. शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या सांगण्यावरूनच माझ्यावर हल्ला केला, असे जखमी कराळे याचे म्हणणे आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात तणाव निर्माण झाला आहे.

या हल्ला प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून विठठलं नानभाऊ सातपुते याला अटक करण्यात आली आहे. 

मनोज भाऊसाहेब कराळे, विठ्ठल नाना भाऊ सातपुते, सुनील सातपुते, नितीन भालसिंग, प्रवीण सातपुते, आशिष शिंदे, महेश साके, अशोक सातपुते, अनिकेत शिंदे (सर्व रा.केडगाव शिवाजी नगर) अशी दोन्ही गटातील आरोपीची नावे आहे. 

मीना भाऊसाहेब कराळे यांनी फिर्याद दिली आहे. कराळे यांचा मुलगा मनोज कराळे हा नगर मधून दोन वर्षसाठी तडीपार केले आहे.

तो काल सोमवारी (01) सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास त्यांच्या आजोबांना भेटण्यासाठी नगरला आला होता.

त्याला वर्कशॉप रोड येथील मैदानावर गाठुन जुन्या राजकिय वादाचे कारणावरून विठ्ठल नाना भाऊ सातपुते, सुनील सातपुते, नितीन भालसिंग, प्रवीण सातपुते, आशिष शिंदे, महेश साके, अशोक सातपुते, अनिकेत शिंदे

यांनी प्लास्टिकच्या व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे . 

तर दुसरी फिर्याद विठ्ठल नानाभाऊ सातपुते यांनी दिली. काल सोमवारी पीडब्ल्यूडी वर्कशॉप रोड येथील हॉलीबॉल मैदानावर रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मनोज भाऊसाहेब कराळे हा फिर्यादिस विनाकारण शिवीगाळ करत होता.

तू मला शिवीगाळ का करतो असे म्हणण्याचा राग येऊन आरोपी कराळे याने फिर्यादीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर त्याचे हातातील चाकूने यादीचे अंगठ्या जवळील बोटाला दुखापत करून जिवे ठार मारण्याची धमकी देऊन पळून गेल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!