Ahmednagar CityAhmednagar NewsBreaking

शहर बससेवा अखेर रविवारपासून होणार सुरू !

अहमदनगर :- गेल्या दीड वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली शहर बससेवा अखेर येत्या रविवारपासून (७ जुलै) सुरू होणार आहे.

पूर्ण क्षमतेने सुरू होणाऱ्या दीपाली ट्रान्सपोर्टच्या शहर बसवाहतूक सेवेचे तिकीट दर जुनेच असणार आहेत.

कमीत कमी ५ रुपयांपासून २० रुपयांपर्यंतचे हे दर आहेत. यामुळे प्रवासी रिक्षांद्वारे नगरकरांच्या होणाऱ्या आर्थिक लुटीला आळा बसणार आहे.

तसेच या नव्या बससेवेद्वारे सुरुवातीला प्रवाशांची गर्दी असलेल्या प्रमुख नऊ मार्गांवर बससेवा सुरू केली जाणार आहे.

धरमपुरी-निंबळक, निर्मलनगर, विळदघाट इंजिनीअरिंग कॉलेज व हॉस्पिटल, केडगाव-शाहूनगर, आलमगीर-भिंगार, नागापूर एमआयडीसी, व्हीआरडीई-अरणगाव रस्ता, पाइपलाइन रोड-नित्यसेवा व विळद घाटातील एमबीए कॉलेज अशा नऊ मार्गांवर ही बससेवा सुरू होणार आहे.

सध्याच्या या बससेवेत १० नव्या बसेस आहेत. आणखी ५ नव्या बसेस येत्या पंधरा दिवसांत आणून कमीत कमी १५ बसद्वारे प्रवासी सेवा देण्याचे नियोजन आहे.

दरम्यान नवी शहर बससेवा सुरू करणारी दीपाली ट्रान्सपोर्ट कंपनी शिवसेना नेत्यांची असली तरी तिची सेवा सुरू करण्यास भाजपचे मंत्री प्राधान्याने बोलावण्यात आले आहेत.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे व नवे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत येत्या शनिवारी (६ जुलै) सायंकाळी ५ वाजता जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ या बससेवेचे उद्घाटन होणार आहे.

या वेळी खासदार डॉ. सुजय विखे, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, माजी खासदार दिलीप गांधी, महापालिका आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग आदी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button