अहमदनगर :- शहरातील उड्डाणपुलाच्या कामाची सुरुवात महिनाभरात करण्याचे आदेश केंद्रीय भूपृष्ठवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी मािहती खासदार डॉ. सुजय विखे यांनी दिली.
शहरातील उड्डाणपुलाच्या संदर्भात खासदार डाॅ. विखे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू होण्यासंदर्भात मागणी केली. याबाबतचे निवेदनही त्यांनी मंत्र्याना दिले. याबाबत गडकरी यांनी उड्डाणपुलाच्या कामाची वस्तुस्थिती जाणून घेतली.


या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळून निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असताना केवळ भूसंपादनाच्या कारणामुळे हे काम सुरू होऊ शकत नसल्याची बाब खासदार डाॅ. विखे यांनी गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिली.
उड्डाणपुलाच्या कामासाठी काही ठिकाणी बाकी असलेल्या भूसंपादनाचा कोणताही अडथळा कामात येऊ न देता या कामाला सुरुवात करून, राहिलेले भूसंपादन सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देशही गडकरी यांनी अधिकाऱ्यांना दिले असल्याचे डाॅ. विखे यांनी सांगितले.
नगर शहरातील उड्डाणपुलाचा प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित होता.लोकसभा निवडणुकीच्या निमिताने या कामाला प्राधान्य देऊन मार्गी लावण्याचा शब्द आपण दिला होता. त्याची प्रत्यक्ष सुरुवात आता झाली असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत घेतलेले सकारात्मक निर्णय नगरकरांना दिलासा देणारे असल्याचे विखे यांनी सांगितले.
- आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करा, मौज मजा करण्यासाठी शाळा-कॉलेजला जाऊ नका, पोलीस उपाधीक्षक संतोष खाडे यांनी विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
- भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांचा राहुरीत जनता दरबार, नागरिकांच्या समस्यांचा केला निपटारा
- अहिल्यानगरमधील तरूणांचा गाजियाबाद येथे झालेला मृत्यू संशयास्पद असल्याचा नातेवाईकांचा आरोप
- राहुरी तालुक्यातील मुळा नदीवरील बंधारा अन् पुल दुरूस्तीचे काम ललकरच लागणार मार्गी, काम जलसंपदा विभागकडे वर्ग
- मृत्यू म्हणजे जणू आनंदाचा उत्सव, लोक रंगीबेरंगी कपडे घालून पार्टी करतात! कोणत्या देशात पाळली जाते ही विचित्र परंपरा?