Ahmednagar CityAhmednagar NewsAhmednagar NorthAhmednagar SouthBreakingMaharashtra

महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार !

अहमदनगर :- महाराष्ट्रात पुन्हा भाजपचाच मुख्यमंत्री होणार असून राज्यातील विस्तारक, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र व कार्यकर्त्यांच्या ताकदीवर बहुमताचा आकडा सहज पार होणे शक्य होणार आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यपद्धतीवर, तसेच राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पारदर्शक कारभारामुळे जगात एक नंबर असलेला पक्ष पुन्हा एकदा महाराष्ट्रात बहुमताने सत्तेत येऊन मुख्यमंत्री भाजपचा होणार असल्याचे राज्याच्या प्रभारी खासदार सरोज पांडे यांनी सांगितले.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरमधील बैठकीत त्या बोलत होत्या. या वेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, आमदार स्नेहलता कोल्हे व बाळासाहेब मुरकुटे,

शहर जिल्हाध्यक्ष दिलीप गांधी, संघटनमंत्री किशोर काळकर, महापौर बाबासाहेब वाकळे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, चंद्रशेखर कदम, अड. अभय आगरकर, सचिन तांबे, जालिंदर वाकचौरे, प्रकाश चित्ते उपस्थित होते.

Ahmednagarlive24

No1 News Network Of Ahmednagar जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button