विधानसभेला जिल्ह्यात १२-० असाच निकाल लागेल : राधाकृष्ण विखे

Published on -

नेवासे :- पश्चिम वाहिनीचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्याचा माजी खासदार बाळासाहेब विखे यांचा प्रस्ताव केवळ श्रेय मिळू नये म्हणून मागील सरकारने बासनात गुंडाळला. पण फडणवीस यांनी या प्रस्तावाला प्रतिसाद दिला.

निळवंड्याचा प्रश्न त्यांनी एक तासात मंजूर केला. विदर्भातून आलेल्या नेत्याला जे समजले, ते सत्ता गेली तरी आमच्या जुन्या नेत्यांना समजले नाही, असा टोला गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी विरोधकांना मारला. विखेंनी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे कौतुक केले,

तर काँग्रेसचे नूतन प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली. नेवासे येथील ४ कोटींच्या व्यापारी संकुलाचे भूमिपूजन व घरकुल लाभार्थ्यांना धनादेश वाटपाचा कार्यक्रम विखेंच्या नागरी सत्कारात झाला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष संगीता बर्डे होत्या,

तर प्रमुख पाहुणे म्हणून अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, नितीन दिनकर, नितीन जगताप उपस्थित होते. घरकुलांसाठी जे ४०-४० हजारांचे तीन हप्ते दिले जात,

ते बदलून आता पहिलाच हप्ता थेट १ लाखाचा देण्याची घोषणा विखे यांनी केली. नेवासे तीर्थक्षेत्रासाठी प्रलंबित असलेल्या प्राधिकरणाचा प्रस्ताव मार्गी लावू, असे ते म्हणाले.

मित्र प्रदेशाध्यक्ष झाले, पण जुन्या चेहऱ्यांसह पक्ष कसा वाढणार? मतदारसंघात २५ हजारांनी मागे असल्याने मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे, तरी त्यांना शुभेच्छा. विधानसभेला जिल्ह्यात १२-० असाच निकाल लागेल.” राधाकृष्ण विखे, गृहनिर्माण मंत्री.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!