अकोले :- अकोले विधानसभा अनुसूचित जमातीसाठी राखीव असून ही जागा शिवसेना लढवते. मागील निवडणुकीत युती नसताना भाजप तीन नंबरवर राहिला.
मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत यश भाजपला मिळाले. लोकसभेत जरी तालुक्यातून पीछेहाट झाली असली,
तरी खासदार सदाशिव लोखंडे यांनी धनगर समाजाच्या आरक्षणासाठी घेतलेली भूमिका आदिवासी जनतेला मान्य झाली नाही. अकोल्याची जागा भाजपला मिळाली,
तर ती जिंकण्याचा विश्वास पक्षाचे जि. प. गटनेते जालिंदर वाकचौरे व तालुका संघटन सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केला.
नगरला झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रीय महामंत्री तथा महाराष्ट्राच्या प्रभारी सरोज पांडे, जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे,
उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, खासदार डॉ. सुजय विखे, माजी खासदार दिलीप गांधी, आमदार स्नेहलता कोल्हे,
आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा संघटनमंत्री प्रकाश चित्ते, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सचिन तांबे यावेळी उपस्थित होते.
- ऐकावं ते नवलंच! चक्क आयुष्यभर अंघोळ करत नाही, तरीही ‘या’ देशातील महिला सौंदर्यात आघाडीवर, नेमकं काय आहे त्यांचं ब्युटी सिक्रेट?
- भारताच्या मित्र देशाला मिळाला जगातील सर्वात मोठा तेलसाठा, मात्र अमेरिका-युरोपकडून होतोय प्रचंड विरोध! कारण…
- ब्रिटिश अधिकारी मूर्तीला जिवंत देव का म्हणाले होते?, जगन्नाथ मंदिराच्या गर्भगृहाचे रहस्य ऐकून थक्क व्हाल!
- भारतातील गावांपेक्षाही लहान, ‘हे’ आहेत जगातील सर्वात लहान 7 देश! पण श्रीमंती, सौंदर्य आणि पर्यटनात सर्वात पुढे
- कोणतंही कर्ज न घेता खरेदी करा तुमच्या स्वप्नातलं घर, जाणून घ्या आर्थिक तज्ज्ञांचा 5/20/30/40 फॉर्म्युला!