सीना नदीकाठी बकर्‍या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहमदनगर :- सीना नदीकाठी बकर्‍या चारण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बुधवारी ही घटना घडली असून या प्रकरणी भिंगार पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिडित मुलगी ही वाकोडी शिवारातील सीना नदीकडेला बकर्‍या चारायला घेऊन गेली होती. बंड्या निमसे तेथे आला. त्याने पिडितेला उचलून शेवग्याच्या झाडांमध्ये नेले.

त्याने पिडितेचे कपडे काढले तेव्हा तिने आरडाओरडा केला. परंतु आसपास कोणी नव्हते. बंड्याने तिच्याशी जबरदस्तीने अत्याचर करत तेथून धूम ठोकली.

प्रवीण उर्फ बंड्या अशोक निमसे (रा. पदमपुरवाडी, ता.नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.