शेवगाव :- तालुक्यातील खामगाव येथील शुभांगी राजू शिंदे (वय – 14 ) या शालेय विद्यार्थिनीच्या अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू झाला.
रविवारी दि.21 रोजी दुपारी 2:45 च्या सुमारास घडली. रविवारी शाळेला सुट्टी असल्यामुळे शुभांगी आई व बहिणीसोबत शेतात कपाशी खुरपणी करत होती.
मात्र अचानक पाऊस सुरू झाल्याने पावसामुळे मायलेकी घराकडे आडोशाला जात असताना वीज कडाडून शुभांगीच्या अंगावर कोसळली यामध्ये तिचा मृत्यू झाला.
शुभांगी शेवगाव येथील आबासाहेब काकडे विद्यालयात इयत्ता आठवीत शिकत होती.
माजी आमदार चंद्रशेखर घुले यांना घटनेची माहिती कळताच घटनास्थळी भेट देऊन कार्यकर्तेसह मदत केली.
सदर मुलीचा मृतदेह 108 रुग्णवाहिकेतून शेवगाव येथील शासकीय आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणी करण्यात आली.
रात्री उशिरा शुभांगी च्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- अहमदनगरचे तिसरे खासदार कोण होते ? कोणी उभारले होते महाराष्ट्रातील पहिले वृद्धाश्रम ? वाचा सविस्तर
- आता प्रवरेत होणार हार्ट ट्रान्सप्लांट, बायपास, आणि व्हॅाल चेंनजींग शस्त्रक्रिया ! नव्या ओपरेशन थियटरचे उदघाटन संपन्न
- Ahmednagar News : अहमदनगर झेडपीचा शिक्षक वर्गात मुलींसोबत करायचा नको ते कृत्य ! कोर्टाने सुनावला तीन वर्षांचा कारावास
- Ahmednagar News : नगरला टंचाईच्या झळा ! पाणी संपले चाराही संपला, जनावरे खपाटी गेली..
- मोदींनी १० वर्षात जो विकास करून दाखवला तो इतरांना जमला नाही : खा. सुजय विखे पाटील